मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड आलेल्या गव्हाची उसळ

Photo of Wheat srouts usal by Swati Kolhe at BetterButter
0
8
0(0)
0

मोड आलेल्या गव्हाची उसळ

Mar-08-2018
Swati Kolhe
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोड आलेल्या गव्हाची उसळ कृती बद्दल

गव्हाच्या दाण्यांपेक्षा ३००% जास्त प्रोटीन मोड आलेल्या गव्हामध्ये असते. मोड आलेले गहू खाल्यामुळे मेंटबॉलिझम वाढते तसेच शरीरातील ऊर्जा वाढवते व ब्लड शुगर कंट्रोल करते. मोड अलेल्या गव्हात आपल्याला व्हिटॅमिन A, B, C आणि E मिळते. पचन क्रिया व पोषण तत्व शोषून घेण्यास मदत करते. शरीरातील अतिरिक्त कॅलोरी आणि कार्बोहैद्रात कमी करण्यास फायदेशीर आहे. प्रमाणा बाहेर वाढलेले हृदयाचे ठोके थांबवतात. ज्यांना श्वासाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही मोड आलेले गहू खाणे फायदेशीर ठरते.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • प्रेशर कूक
 • मेन डिश
 • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

 1. मोड आलेले गहू २ कप
 2. मोड आलेली मेथी २ tbsp
 3. हिंग १/८ tsp
 4. जिरे मोहरी १ tsp
 5. हळद १/२ tsp
 6. लाल तिखट १ tsp
 7. गोडा/काळा/ गरम मसाला १/२ tsp
 8. कांदे २ चिरलेले
 9. गूळ १/४ tsp
 10. कोकम १/४ tsp
 11. मीठ चवीनुसार
 12. गायीचे तूप १ tbsp
 13. चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सजावटीसाठी

सूचना

 1. गव्हाला मोड आणण्यासाठी १ कप गहू २-३ पाण्याने धून घ्यावेत व १ दिवस भिजवावे. पुढे पाणी काढून स्वछ सुटी कापडात बांधून ठेवायचे साधारण २-३ दिवसात(वातावरण वर अवलंबून) मोड येते.
 2. प्रथम कुकर घेऊन त्यात तूप गरम करून हिंग, जिरे, मोहरी ची कडकडीत फोडणी द्यावी.
 3. कांदे घालून तांबूस परतावे.
 4. हळद, लाल तिखट घालून १ मिनिट परतावे
 5. मोड आलेले गहू, मेथी व मीठ घालून छान एकजीव करून करून घ्यावे.
 6. आवडीचा मसाला घालून घ्यावा.
 7. शेवटी गूळ, कोकम व २ कप पाणी घालून ३-४ शिट्या काढून घ्यावेत.
 8. सर्व्ह करताना वरून कांडा,टोमॅटो,कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर