मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड आलेल्या मुगाचा ढोकळा

Photo of Mod aalelya mugacha dhokala by Shilpa Deshmukh at BetterButter
1534
8
0.0(0)
0

मोड आलेल्या मुगाचा ढोकळा

Mar-08-2018
Shilpa Deshmukh
960 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोड आलेल्या मुगाचा ढोकळा कृती बद्दल

मोड आलेल्या मुगात व्हिटॅमिन बी सी आणि कॆ असतं शिवाय यामध्ये फायबर असल्यामुळे वेट लॉस करण्यासाठी मदत होते . मोड आलेली कडधान्ये खाल्ल्याने खालीलप्रमाणे फायदे होतात. प्रथिने पचायला सोपी होतात. सर्व जीवनसत्वांची अनेक पटीने वाढ होते. मोड काढण्यापूर्वी 100 ग्रॅम कडधान्यामध्ये ‘क’ जीवनसत्व हे 2 ते 6 मिलिग्रॅम असते. हेच प्रमाण मोड काढल्यानंतर 27 ते 52 मिलिग्रॅमपर्यंत वाढू शकते. मोड आणल्यामुळे कडधान्यांचा वातुळपणा कमी होतो. मोड काढण्याच्या प्रक्रियेत टरफलामध्ये असलेले टॅनीन आणि फायटीक अ‍ॅसीड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होते. त्यामुळे लोहाचे आणि चुण्याचे शोषण वाढते. याचा शरीराला चांगला फायदा हो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. दोन कप मोड आलेले मूग
  2. 1 कप तांदूळ
  3. 1/4 tbsp सायट्रिक ऍसिड
  4. 1 tbsp साखर￰
  5. 1 हिरवी मिरची
  6. मीठ
  7. इनो 1 चमचा

सूचना

  1. मूग पाण्यात 7-8 तास भिजत घाला .
  2. भिजल्यावर पाणी झारुन एका सुती कापडात बांधून ठेवा .
  3. तांदूळ 4-5 तास भिजत घाला.
  4. कुकरमध्ये कॅसरोलमध्ये किंवा मायक्रोवेव्ह मध्ये ठेवल्यास मोड छान येते.
  5. मिक्सरमध्ये एक मिरची मूग वाटून घ्या .रवाळ वाटायचं आहे .
  6. तांदूळही वाटून घ्या आणि दोन्ही एकत्र करा.
  7. यामध्ये मीठ ,साखर ,हळद मिक्स करा.
  8. इडलीपात्रात पाणी घाला .तोपर्यंत एका प्लेटला तेलाने ब्रश करून घ्या लगेच मिश्रणात इनो मिक्स करा
  9. प्लेटमध्ये ओता .आणि प्लेट इडलीपात्रात ठेवा .किंवा एखादया मोठ्या कढईत पण खाली पाणी घालून वर अडणी ठेवून त्यावर प्लेट ठेवून झाकून वाफवता येतं.
  10. 15 मिनिट झाले कि गॅस बंद करा आणि थंड झाल्यावर सुरीने वड्या पाडतो तसे ढोकळे पाडा .
  11. खोबरं ,कोथिंबीर ,मिरची आणि मीठ थोडं पाणी घालून वाटून घ्या आणि ह्या चटणीसोबत सर्व्ह करा .हेल्दीवेल्दी ढोकळा रेडी .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर