मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र कडधान्याची भेळ

Photo of Mixed sprouts bhel by Swati Kolhe at BetterButter
1972
5
0.0(0)
0

मिश्र कडधान्याची भेळ

Mar-08-2018
Swati Kolhe
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र कडधान्याची भेळ कृती बद्दल

मोड काढण्यापूर्वी 100 ग्रॅम कडधान्यामध्ये क जीवनसत्व हे 2 ते 6 मिलिग्रॅम असते. हेच प्रमाण मोड काढल्यानंतर 27 ते 52 मिलिग्रॅम पर्यंत वाढू शकते.मोड आणल्यामुळे कडधान्यांचा वातुळपणा कमी होतो. मोड काढण्याच्या प्रक्रियेत टरफलामध्ये असलेले टॅनीन आणि फायटीक अॅसीड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होते. त्यामुळे लोहाचे आणि चुण्याचे शोषण वाढते. याचा शरीराला चांगला फायदा होतो. मोड आणण्याच्या प्रक्रियमध्ये कडधान्य हलके होतात आणि पचायला सुलभ होतात.मोड आलेली कडधान्य सुकवून ठेवता येतात. अशा सुकविलेल्या मोडामध्ये कर्बोदकांचे आणि क जीवनसत्वे मोठया प्रमाणावर वाढते. सुकविलेले मोड थोडया वेळ पाण्यात टाकून पुन्हा टवटवीत करता येता. अशी कडधान्ये प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्वांनी समृध्द असतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मिश्र कडधान्य २ कप
  2. काकडी बारीक चिरलेली २ मध्यम
  3. मोठा कांदा चिरलेला १
  4. मोठा टोमॅटो चिरलेला १
  5. हिरवी शिमला मिरची १
  6. मेथी जुडी १/८ कप
  7. हिरवी मिरची ३
  8. लिंबाचा रस १ tbsp
  9. मीठ चविनुसार
  10. चाट मसाला १ tbsp
  11. कोथिंबीर १/८ कप
  12. तेल १ tsp
  13. २ चिमूट हिंग
  14. भाजलेली जिरं पावडर १ tsp
  15. १/२ कप कुरमुरे (ऑप्शन्सल)

सूचना

  1. प्रथम मोठ्या बाउल मध्ये कडधान्य घ्यावे.
  2. त्यात काकडी, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची घालावी.
  3. मग त्यात लिंबाचा रस, मीठ, चाट मसाला, मेथी, कोथिंबीर घालून मिक्स करावे.
  4. फोडणीच्या भांड्यात तेल गरम करून त्यात हिंग आणि हिरवी मिरची ची फोडणी द्यावी.
  5. तयार फोडणी वरील कडधान्याच्या मिश्रणात घालून पटापट मिक्स करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर