BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दी हार्ट ओटस डम्पलिंगस

Photo of Healthy Heart Oats Dumplings by Purva Sawant at BetterButter
0
6
0(0)
0

हेल्दी हार्ट ओटस डम्पलिंगस

Mar-09-2018
Purva Sawant
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हेल्दी हार्ट ओटस डम्पलिंगस कृती बद्दल

ओटस हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे पण दुधातून ओटस खाणं हे फारच कंटाळवाणे आहे. या पद्धतीने ओटस खाल्यास खूपच रुचकर लागतात.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • कर्नाटक
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. रोल ओटस- १ कप
 2. पाणी - ३/४ कप
 3. कांदा, बारीक चिरलेला - २ टेबलस्पून
 4. आलं, बारीक चिरलेलं - १ टेबलस्पून
 5. गाजर, बारीक चिरलेलं - २ टेबलस्पून
 6. शिमला मिरची, बारीक चिरलेली  - १ टेबलस्पून
 7. मटार - २ टेबलस्पून
 8. हिरवी मिरची,बारीक चिरलेली  - ४
 9. कोथिम्बिर, बारीक चिरलेली  - २ टेबलस्पून
 10. खवलेल ओल खोबर - २ टेबलस्पून (ऐच्छिक )
 11. मोहरी- १ टीस्पून
 12. हळद- १/२ टीस्पून
 13. हिंग- १/४ टीस्पून
 14. ऑलिव ओईल किंव्हा कुठलही तेल- ३ टीस्पून
 15. मीठ- चवीप्रमाणे

सूचना

 1. एका प्यान मध्ये तेल गरम करा. मोहरी टाका, तडतडल्यावर  त्यात मिरची, कांदा आणि आल टाका. हळद आणि हिंग टाकून जरासं परता.  त्यात राहिलेल्या भाज्या आणि मीठ टाकून १-२ मिनिट परता. पाणी टाका आणि उकळी येऊ द्या.
 2. त्यात ओटस टाका आणि व्यवस्थित ढवळून एकत्र करून घ्या. झाकण ठेऊन १ मिनिट वाफ काढा. मिश्रण खूप कोरडे वाटत असेल तर किंचित पाणी शिंपडा. पण एक लक्ष्यात ठेवा कि पाण्याचे प्रमाण हे ओटस पेक्षा कमीच असले पाहिजे अन्यथा मिश्रण चिकट बनेल.
 3. नंतर त्यात कोथिंबीर आणि खोबर टाकून व्यवस्थित ढवळून एकत्र करून घ्या. मिश्रण थंड होऊ द्या . (या स्टेपला हे मिश्रण गरम असताना सर्व्ह केले तरी चालेल हा एक प्रकारचा ओटस उपमाच आहे. छान रुचकर लागतो.)
 4. त्या मिश्रणाचे सारखे गोळे करून इडली पात्रात  किंव्हा मोदक पात्रात ४ ते ५ मिनिट वाफवा. मायक्रोवेव्ह ओवन मध्ये पण करू शकता.
 5. टोमाटो केचप किंव्हा कुठल्याही चटणीसोबत गरमागरम वाढा. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर