436
5
0.0(1)
0

Sprouts soup

Mar-09-2018
Swati Kolhe
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • चायनीज
  • सौटेइंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. मोड आलेले कोणतेही धान्य १/२ कप
  2. कांदा चिरलेला १ मध्यम
  3. कोबी उभा चिरलेला २ tbsp
  4. गाजर उभं चिरलेल २ tbsp
  5. शिमला मिरची चिरलेली २ tbsp
  6. कांद्याची पात ३ tbsp
  7. लसूण बारीक कापलेला २ tsp
  8. अद्रक बारीक कापलेले १ tsp
  9. हिरवी मिरची पेस्ट १/४ tsp
  10. तेल २ tbsp
  11. कॉर्नफ्लोअर १-२ tsp
  12. रेड चिली सॉस १ tbsp
  13. मीठ चवीनुसार
  14. पाणी

सूचना

  1. मोड आलेले धान्य स्वछ धुवून ते ३ ग्लास पाण्यात मीठ घालून वाफवून घ्यावे. साधारण बोटचेपे पेक्षा कमी शिजले पाहिजे.
  2. शिजलेल्या धान्यातून पाणी काढून घ्यावे व बाजूला ठेवावे.
  3. लोखंडी कढई मध्ये तेल तापवून त्यात अद्रक, लसूण मिरची पेस्ट फ्राय करून घ्या.
  4. आता कोबी, गाजर, सिमला मिरची, अर्धी कांद्याची पात व थोडे मीठ घालून अर्धवट शिजवावे.
  5. १/४ कप पाण्यात कॉर्नफ्लोअर मिसळून घ्यावा.
  6. भाज्यांमध्ये धान्य घालून १ मिनिट परताव.
  7. चिली सॉस घालून चांगले टॉस करून घ्यावे.
  8. मग कॉर्नफ्लोअरचे केलेले पाणी घालून १-२ मिनिट शिजवावं
  9. शेवटी धान्याचे काढलेले पाणी घालून ५ मिनिट शिजवावे.
  10. सर्व्ह करताना वरून कांद्याची पात घालून गरमागरम सूप द्यावे.
  11. टीप: कॉर्नफ्लोअर अगदीच नको असेल तर १ छोटा वाफवलेला बटाटा मॅश करून त्यात २-३ tbsp पाणी घालून घट्टसर पेस्ट बनवून ती सूप मध्ये ऍड करावी. :blush::stew:

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Mar-13-2018
BetterButter Editorial   Mar-13-2018

Hi Swati, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर