Photo of sugar free wheat cake by साची सचिन at BetterButter
1233
6
1.0(4)
0

sugar free wheat cake

Mar-10-2018
साची सचिन
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी गव्हाच पीठ
  2. २ ते ३ चमचे मध
  3. पाव वाटी गाईचे तूप किंवा तेल
  4. १ चमचा बोर्नविटा किंवा कोको पाउडर
  5. १/२ चमचा वैनिला एसेन्स
  6. १ चमचा दही
  7. १ चमचा बेकिंग पाउडर
  8. पाव चमचा बेकिंग सोडा
  9. पाव वाटी दूध
  10. अवडीनुसार टूटीफ्रूटी किंवा सुका मेवा

सूचना

  1. एका बाउल मधे तूप आणि मध घेऊन फेटुन घ्या
  2. आता त्यात बोर्नविटा घालुन पुन्हा फेटुन घ्या
  3. आता त्यात थोड़े थोड़े गव्हाचे पीठ घालुन फेटुन घ्या (मिश्रण फेटताना एकाच बाजूने फेटावे)
  4. आता थोड़ थोड़ दूध आणि १ चमचा दही घालुन मिश्रण पातळ करुन घ्या
  5. आता १० मिनट झाकून ठेवा
  6. तो पर्यंत एका कढ़ाइत मिठ घालुन त्यावर जाळी ठेवून मध्यम गॅस वर गरम करुन घ्या
  7. आता एका पसरट वाटीला तेल लावून त्यावर पीठ भुरभुरावे
  8. आता वरील मिश्रणात् १ चमचा बेकिंग पाउडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालुन मिक्स करा आणि त्यात अवडीनुसार टूटीफ्रूटी किंवा सुकमेवा घाला आणि मिक्स करा
  9. आता ग्रीसिंग केलेल्या वाटी मधे मिश्रण आतून हल्केच वाटी आपटुन मिश्रण सेटी करा
  10. आता तापलेल्या कढ़ाइत ठेऊन मध्यम गॅस वर १५ मिनिटे आणि १० मिनिटे बारीक गॅस वर केक बेक करा
  11. टूथपिक किंवा सुरीच्या टोकने केक चेक करा आता केक तयार आहे.
  12. सुरिने कडा सैल करुन केक प्लेट मधे काढून घ्या
  13. आता वरुन त्याला सुरिने ६ ते ७ ठिकाणी टोचुन घ्या
  14. आता त्यावर १ चमचा मध लावून घ्या
  15. वरुन डेसिकेटेड कोकोनट भुरभुरुन सर्व्ह करा शुगर फ्री आटा केक

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
स्मित शिवदास
Mar-10-2018
स्मित शिवदास   Mar-10-2018

wow khup chanch diabetes sathi uttam

Swati Kulkarni
Mar-10-2018
Swati Kulkarni   Mar-10-2018

हेल्दी व टेस्टी

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर