BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक पराठा

Photo of Nutritious paratha by Swati Kolhe at BetterButter
1
8
0(0)
0

पौष्टिक पराठा

Mar-10-2018
Swati Kolhe
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक पराठा कृती बद्दल

हिरव्या पालेभाज्या कॅल्शिअम, बीट कॅरोटीन आणि क जीवनसत्वाचा समृध्द स्रोत आहे. पालक- लोह आणि कॅल्शियम असल्यामुळे रक्तवाढीला आणि हाडे बळकट व्हायला उपयुक्त असते. ज्यांचे पोट वारंवार बिघडते त्यांना तर ही गुणकारी ठरते. मेथी- मधुमेही व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त असते. भूक आणि अन्नपचन सुधारते, पोटात गॅसेस होत नाहीत.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. सारणासाठी:
 2. तेल १ tbsp
 3. हिंग १/८ tsp
 4. अद्रक लसूण पेस्ट १ tsp
 5. मिरची पेस्ट १ tsp
 6. कांदा १
 7. कोबी २ tbsp
 8. गाजर २ tbsp
 9. फरसबी २ tbsp
 10. सिमला मिरची २ tbsp
 11. बदाम पावडर २ tbsp
 12. पालक, मेथी १/२ कप
 13. उकडलेला बटाटा १
 14. धणेपूड १/२ tsp
 15. जिरेपूड १/२ tsp
 16. गरम मसाला १ tsp
 17. आमचूर १/४ tsp
 18. मीठ चवीनुसार
 19. पराठासाठी:
 20. १ कप कणिक
 21. ओवा चिमूटभर
 22. तेल १ tsp
 23. मीठ २ चिमूटभर
 24. पाणी

सूचना

 1. प्रथम पराठ्याची दिलेले साहित्य वापरून पराठ्याची कणिक मध्यम मळून घ्यावी.
 2. लोखंडी कढई मध्ये तेल तापवून त्यात हिंग, अद्रक लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, कांदा परतून घ्या.
 3. मग कोबी,गाजर,फरसबी,शिमला मिरची व थोडेच मीठ घालून वाफवून घ्या.
 4. वरील भाज्या शिजल्यावर त्यात धनेजिरे पूड, गरम मसाला परतून घ्या.
 5. नंतर पालक,मेथी थोडे मीठ घालून अर्धाच मिनिट परतवा.
 6. शेवटी आमचूर पावडर, उकडलेला बटाटा चेचून व बदाम पावडर टाकून छान एकजीव करावे(टीप).(कोथींबीर घालणार असाल, तर आताच घालावी)
 7. भाजीचे मिश्रण थंड झाल्यावर पराठ्या च्या पारीमध्ये भाजी स्टफ करून पराठा लाटून घ्या.
 8. दोन्ही बाजूने कमी तेल वापरून पराठा खमंग शेकून घ्या.
 9. दह्याची चटणी, टोमॅटो सॉस, किंवा दही कोशिंबीर सोबत सर्व्ह करा.
 10. टीप: सारण गचगच झालेले हवे कोरडे किंवा अख्ख्या भाज्या राहिल्यात तर पराठा फाटू शकतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर