मुख्यपृष्ठ / पाककृती / बीट पचडी

Photo of Beetroot pachadi by Swati Kolhe at BetterButter
0
5
0(0)
0

बीट पचडी

Mar-10-2018
Swati Kolhe
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट पचडी कृती बद्दल

तसं तर बीट सलाड म्हणून कच्चा खाल्लं जातं किंवा याचा ज्यूस बनविला जातो. परंतू रक्ताची कमी किंवा मासिक पाळी संबंधी समस्या दूर करण्यासाठी दररोज एक बीट उकळून खाणे अधिक फायद्याचे आहे. परंतू ३ मिनिटांपेक्षा अधिक उकळू नका. बीटामुळे तुमच्या ब्लड प्रेशर पासुन तर सेक्सुअल स्ट्रमिना वाढवण्याची क्षमता असते. हे एक नॅचरल फूड कलरचे कामसुध्दा करते. बीट नायट्रेट्सचा एक चांगला स्रोत आहे. याचे सेवन केल्यावर हे नायट्राट्स आणि एक गॅस नायट्रिक ऑक्साइड्समध्ये बदलते. हे दोन्ही गुण धमन्यांना रुंद करण्यात आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते. संशोधनानुसार प्रत्येक दिवशी ५00 ग्रॅम बीट खाल्ल्याने ६ तासांच्या आत ब्लड प्रेशर कमी होते

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 •  केरळ
 • सौटेइंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. खिसलेलं बीट २
 2. तेल २ tsp
 3. खवलेला ओला खोबर १/४ कप
 4. हिरवी मिरची २
 5. पातीचा कांदा ५
 6. जिरं १/२ tsp
 7. कडीपत्ता ६-७ पान
 8. मोहरी १/४ tsp
 9. दही २ कप
 10. लाल सुकी मिरची १(ऑप्शनल) हिरवी चालेल

सूचना

 1. प्रथम मिक्सर मध्ये हिरवी मिरची, २ कांदे, जिरं आणि थोडे पाणी घालून वाटण तयार करावे.
 2. लोखंडी कढईमध्ये १ tsp तेल घालून त्यात बीट आणि मीठ घालून वाफवून घ्या.(पाणी नाही घालायचे, घातले तेही अगदी शिजून संपून जाईल इतकेच)
 3. बीट शिजल्यावर वरील वाटण घालून २-३ मिनिट परतावं.
 4. वाटण आणि बीट बीट चांगले शिजून एकजीव झाल्यावर हे मिश्रण पसरट बाउल मध्ये काढून घ्यावे.
 5. वरील मिश्रणात दही घसळून छान एकत्र एकजीव करून घ्यावे
 6. फोडणीच्या कढई मध्ये उरलेले तेल घेऊन त्यात मोहरी, कडीपत्ता व वापरणार असाल तर लाल मिरची घालून फोडणी तयार करावी.
 7. ही फोडणी तयार बीटाच्या मिश्रणात घालून मिक्स करून सर्व्ह करावे.
 8. आम्ही ३ महिन्यांपूर्वी केरला ला गेलो होतो तिकडे शिकून आले आहे ही रेसिपी. खादाड खाऊ हो शेवटी काय करणार कंट्रोल नाही होत. :blush::blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर