मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसनाचे धिरडे

Photo of Besanache Dhirade by Manisha /(Radhika wagh) at BetterButter
1985
5
0.0(0)
0

बेसनाचे धिरडे

Mar-11-2018
Manisha /(Radhika wagh)
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसनाचे धिरडे कृती बद्दल

हा पौष्टिक पदार्थ आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक कप बेसन
  2. ३कांदे , बारीक चिरून
  3. २ टोमॅटो बारीक फोडी
  4. ३-४ बारीक मिरच्या,चिरून
  5. २-३ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
  6. १/४ टीस्पून हळद
  7. १/४ टीस्पून हिंग
  8. २ चिमटी जिरे
  9. चवीपुरते मीठ
  10. धिरडी बनवताना थोडे तेल
  11. १ + १/२ कप पाणी

सूचना

  1. खोलगट बाऊल मध्ये बारीक चिरलेले कांदे, टोमॅटोच्या फोडी,मिरच्या बेसन, हळद,हिंग,जिरे, कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ,हे सगळे ऐकत्र मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालून मध्यमसर मिश्रण बनवावे. गुठळ्या राहू देवू नयेत.
  2. नॉनस्टिक तवा गरम करून आच मिडीयम-हाय फ्लेमवर ठेवावी. थोडेसे तेल घालावे. लाकडी कालथ्याने ते सर्वत्र पसरवावे. डावभर मिश्रण तव्यावर घालून पातळसर धिरडे घालावे.
  3. झाकण ठेवावे. १ मिनिटाने झाकण काढून धीराद्याच्या कडेने थोडे तेल सोडावे. परत झाकण ठेवून २ मिनिटे एक बाजू शिजू द्यावी. झाकण काढून दुसऱ्या बाजूला धिरडे पलटावे. झाकण ठेवून दुसरी बाजू शिजू द्यावी. लागल्यास थोडे तेल घालावे.
  4. गरम धिरडे लोणचे, नारळाच्या चटणीबरोबर किंवा लसणीच्या तिखटाबरोबर खायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर