BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ओट्स इडली

Photo of Ots Idaly by Pranali Deshmukh at BetterButter
0
11
0(0)
0

ओट्स इडली

Mar-11-2018
Pranali Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओट्स इडली कृती बद्दल

100 gr.ओट्स मध्ये पाणी 8 % कॅलरी 389 .प्रोटीन 16.9g.फायबर 10.8 g. असते त्यामुळे ओट्स हे अतिशय पौष्टिक आहे .ज्यांना हृदयसंबंधी समस्या आहेत त्यांनी रोज ओट्स नाश्त्यामध्ये किंवा जेवनात घेतल्यास कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये राहते .ज्यांना अस्थमा ,कफ यासारख्या आजारांना पळवतो .ओट्स च्या नियमित सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रित राहते .शिवाय यामध्ये फॅटचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होते .ओट्स पचायला हलके असते .ओट्समध्ये स्टार्च चे प्रमाण खूप कमी असते त्यामुळे ते पाण्याचं संतुलन नियंत्रित ठेवतात . ओट्स’मधील काही घटकांमुळे ब्रेस्ट कॅन्सरसारख्या हार्मोन्स संबंधित रोगांची शक्यता कमी होते. प्रोस्टेट, ओव्हेरियन कॅन्सरच्या बाबतीतही हे होईल, असं वैज्ञानिकांना वाटतं. आंतरराष्ट्रीय संशोधनातील निष्कर्षांनुसार चोथ्याचं प्रमाण खूप असलेला ओट्ससारखा आहार असलेल्या स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन या हार्मोनची पातळी कमी असते. त्यामुळे त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी संभवतो. ‘ओट्स’मधील न विरघळणार्‍या चोथ्यामुळे आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यताही कमी होते. रोज ओट्स खाल्ल्याने त्यातील विरघळणार्‍या चोथ्यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहण्यास मदत होते.

रेसपी टैग

 • व्हेज
 • कठीण
 • एव्हरी डे
 • इंडियन
 • स्टीमिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

 1. 1 वाटी प्लेन ओट्स
 2. 1/2 वाटी रवा
 3. 1/4 कप दही
 4. 1/4 कप मटार
 5. 1/4 कप गाजर किसून
 6. 2 चमचे उडीद डाळ
 7. 2 चमचे चणा डाळ
 8. 1 कांदा बारीक चिरून
 9. कढीपत्ता 3-4
 10. मोहरी 1 tbsp
 11. मीठ
 12. तेल 1 छोटा tbsp
 13. फ्रुट इनो 1 चमचा
 14. पाणी 1 कप

सूचना

 1. ओट्स म्हणजे जव . आणखी वेगळं काही नाही .यामध्ये फायबर आणि प्रोटीन च प्रमाण जास्त असतं शिवाय एक वाटी ओटमील घेतल्यावर लगेच भूक लागत नाही .हळुहळु पचन होतं त्यामुळे आपोआप वजन कमी करायला मदत होते.
 2. ओट्स हलके भाजून घ्यायचे सुगंध आल्यावर गॅस बंद करायचा आणि थंड करायचे.
 3. थंड झाले कि मिक्सरला फिरवून घ्यायचे .खूपबारीक करायचे नाही कारण इडली रवाळ छान लागते जर जास्त बारीक ग्राइंड केले तर इडली चिकट होते.
 4. पॅनमध्ये तेल टाका तेल तापल्यावर मोहरी ,कढीपत्ता ,उडीद डाळ ,चणा डाळ भाजून घ्या.
 5. आता कांदा घाला आणि थोडावेळ परतवा.
 6. कांदा झाला कि रवा घाला आणि पाच मिनिट छान भाजून घ्या.
 7. रवा एका बाऊलमध्ये काढा ,त्यामध्ये बारीक केलेली ओट्स ,मटार ,गाजर ,मीठ घाला आणि दही घालून मिक्स करा.
 8. दही मिक्स केल्यावर थोडं पाणी घालून इडली च्या बॅटर प्रमाणे पातळ झाले पाहिजे .खूपघट्ट नको आणि खूप पातळही नको .इडली च्या मोल्ड मध्ये टाकतांना चमच्याने ड्रॉप पडला कि समजायचं बॅटर जमलं.
 9. इडली पात्रात पाणी घालून उकळायला ठेवा आणि इडली मोल्डला ग्रीसिंग करा.
 10. उकळी आली कि फ्रुट इनो थोड्या पाण्यात मिक्स करून ऍड करा आणि एकाच दिशेने मिक्स करा .
 11. इनो घातल्यावर लगेच बॅटर वर आल्यासारखे वाटेल.
 12. मोल्डमध्ये बॅटर सेट करा आणि पात्रात ठेवून .झाकण लावून 15 मिनिट होवू द्या .
 13. पंधरा मिनिटांनी गॅस बंद करा आणि 10-15 मिनिट थंड होऊ द्या .नंतर सूरी च्या साहाय्याने इडली काढून घ्या .
 14. काढतांना घाईघाईत काढली तर मोल्डला बरेचदा इडली चिकटते म्हणून थंड झाल्यावर काढायची .
 15. चार पाच खोबऱ्याचे तुकडे ,पुदिना ,दोन हिरव्या मिरच्या ,लिंबाचा रस ,साखर ,मीठ घालून मिक्सर मध्ये चटणी वाटून घ्या .
 16. चटणी आणि इडली सर्व्ह करा.
 17. रोज ओट्स मिल एकवेळ जरी घेतले तरी तुम्ही फिट रहाल आणि चवीचं म्हणाल तर ! पौष्टिक पदार्थ हा दिसायला आकर्षक नसतो आणि चवही नसते असा आपला दृष्टिकोन बनला आहे .
 18. पण ओट्समुळे इडलीला खूप छान चव येते अशी रंगबिरंगी इडली मुलेही आवडीने खातील .बरेचदा मुलं भाजी पोळी खायला टाळतात तुम्हाला टिफिनमध्येही देता येईल .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर