945
6
0.0(2)
0

JOWAR poha

Mar-11-2018
Swati Kolhe
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

JOWAR poha कृती बद्दल

उन्हाळा आला की माझी आजी वाळवण मध्ये ज्वारीचे पोहे बनवायची. तिच्या हातच्या पोह्यांची आज पर्यंत आमला काही बनवता आलेली नाहीये. सध्या मसरकेत मध्ये सहज उपलब्ध आहेत हे पोहे.ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते. ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते. ज्वारीचे फायदे – 1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते. 2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते. 3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात. 4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे. 5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे. 6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो. 7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी. 8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे. 9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात. 10) शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे. ज्वारीच्या पिठाची भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात. ज्वारीपासून रवा, लाह्या, पीठ, मिश्रधान्य पीठ, कळणा पीठ, हुरडा, पोहे, पास्ता, पापड, केक, बिस्कीट, कुकीज, ब्रेड, बन, बाल आहार, सिरप व साखर (गोड ज्वारीपासून) भरडा, मोड आणून बनविलेले पीठ (मालट फ्लोअर) हे पदार्थ तयार करता येतात. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास आहारातील पोषकमूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते. ज्वारीचे पीठ, रवा, शेवया, पास्ता, बेकरीचे पदार्थ, पोहे, लाह्या तयार करण्याचे तंत्र कृषी विद्यापीठ, अन्न तंत्र विभाग, प्रक्रिया विभाग, संशोधन केंद्रांनी विकसित केले आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ज्वारीचे पोहे २ कप
  2. तेल १ tbsp
  3. हिंग २ चिमूटभर
  4. मोहरी १/२ tsp
  5. कडीपत्ता ५-६
  6. शेंगदाणे २ tbsp
  7. हिरवी मिरची २-३
  8. कांदा १ मोठा
  9. लाल मिरची पावडर १/४ tsp
  10. हळद १/४ tsp
  11. सजावटीसाठी
  12. कोथिंबीर
  13. लिंबाचा रस

सूचना

  1. प्रथम पोहे भिजवतो तवसेच ज्वारीचे पोहे भिजवून घ्यायचे.
  2. लोखंडी कढई मध्ये तेल तापवून त्यात हिंग, मोहरी, कडीपत्ता, शेंगदाणे घालून टाळून घ्या.
  3. नंतर हिरवी मिरची टाळून घ्या.
  4. कांदा व थोडे मीठ घालून गुलाबीसर परतून घ्या.
  5. कांदा झाला की हळद, लाल तिखट घालून १ मिनिट परतवा.
  6. आता भिजवलेले पोहे घालून छान दणदणीत अशी वाफ काढून घ्या.
  7. पोहे शिजले की शेवटी कोथिंबीर घालून छान मोक्स करून गॅस बंद करावा.
  8. सर्व्ह करताना लिंबाचा रस किंवा फोडी ठेऊन गरमागरम पोहे मतकवावे:yum::yum::yum::yum::yum:.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Mar-13-2018
BetterButter Editorial   Mar-13-2018

Hi Swati, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

Chayya Bari
Mar-11-2018
Chayya Bari   Mar-11-2018

नवीनच! वाळवणात कसे बनवतात ह्ये पोहे ते pleaseee.... सांगा मसरकेत म्हणजे मार्केट म्हणायचं का तुम्हाला समजले नाही प्लीज सांगा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर