BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स डाळींचा उत्तप्पा

Photo of Mix Dalincha Uttappa by Anuradha Kuvalekar at BetterButter
436
8
0(0)
0

मिक्स डाळींचा उत्तप्पा

Mar-11-2018
Anuradha Kuvalekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स डाळींचा उत्तप्पा कृती बद्दल

वेगवेगळ्या डाळी २-३ तास भिजवून केलेला पौष्टिक असा मिक्स डाळींचा उत्तप्पा. त्यात चिरलेला पालक, किसलेले गाजर व मक्याचे दाणे घालून पौष्टीकता वाढवता येते. पटकन सकाळी खाण्यासाठी करता येईल असा प्रकार. वाटलेल्या तयार पीठाचे डोसे पण करता येतात.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. १ वाटी चणाडाळ
 2. १ वाटी उडिदडाळ
 3. १ वाटी तूरडाळ
 4. १ वाटी मूगडाळ
 5. १ वाटी मसूरडाळ
 6. १ वाटी इडली रवा
 7. १ वाटी जाडे पोहे
 8. १ वाटी बारीक चिरलेला पालक
 9. १ वाटी किसलेले गाजर
 10. १ वाटी मक्याचे दाणे
 11. तेल आवश्यकतेनुसार
 12. मीठ चवीनुसार

सूचना

 1. वरील सगळ्या डाळी व इडली रवा एकत्र करून धुवून २-३ तास भिजवा व मिक्सरमध्ये बारीक वाटा.( आवडत असल्यास त्यात आलं व मिरचीची पेस्ट घाला) चवीनुसार मीठ घालून एकत्र करा.
 2. नाॅन-स्टीकचा तवा तापवून त्यात मिनी उत्तप्पा घाला त्यावर बारीक चिरलेला पालक, किसलेले गाजर, मक्याचे दाणे घाला. थोडे तेल सोडून उत्तप्पा दुस-या बाजूने शेका व चटणी बरोबर सर्व्ह करा. आवडत असल्यास किसलेले चीझ घाला.
 3. गरम गरम चटणी/ साॅस बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर