BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ओट्स ,स्प्राऊट्स मूग ,मटकी कटलेट

Photo of Ots,sprouts mug, mataki cutlet by Shilpa Deshmukh at BetterButter
0
3
0(0)
0

ओट्स ,स्प्राऊट्स मूग ,मटकी कटलेट

Mar-11-2018
Shilpa Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओट्स ,स्प्राऊट्स मूग ,मटकी कटलेट कृती बद्दल

ओट्स मध्ये फायबर आणि प्रोटीन असतात .ओट्स हे पचायला हलके असतात . शिवाय ब्लडप्रेशर ,डायबिटीज ,हार्ट प्रॉब्लेम यापासून दूर राहायचं असेल तर रोजच्या जेवणात ओट्स चा वापर करावा .मोड आलेले कडधान्य पचायला हलके असते मोड आलेली कडधान्ये खाल्ल्याने खालीलप्रमाणे फायदे होतात. प्रथिने पचायला सोपी होतात. सर्व जीवनसत्वांची अनेक पटीने वाढ होते. मोड काढण्यापूर्वी 100 ग्रॅम कडधान्यामध्ये ‘क’ जीवनसत्व हे 2 ते 6 मिलिग्रॅम असते. हेच प्रमाण मोड काढल्यानंतर 27 ते 52 मिलिग्रॅमपर्यंत वाढू शकते. मोड आणल्यामुळे कडधान्यांचा वातुळपणा कमी होतो. मोड काढण्याच्या प्रक्रियेत टरफलामध्ये असलेले टॅनीन आणि फायटीक अ‍ॅसीड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होते. त्यामुळे लोहाचे आणि चुण्याचे शोषण वाढते. याचा शरीराला चांगला फायदा होतो.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किटी पार्टी
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

 1. 1 वाटी ओट्स
 2. 1 वाटी मोड आलेले मूग
 3. 1 वाटी मोड आलेली मटकी
 4. 1 बॉईल बटाटा
 5. 3-4 हिरव्या मिरच्या
 6. कांदा बारीक कापलेला
 7. गाजर 2 चमचे किसून
 8. कोथिंबीर आवडीनुसार
 9. अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा
 10. मीठ
 11. तीळ 1 चमचा
 12. तेल 2 चमचे

सूचना

 1. मटकी आणि मूग 7-8 तास भिजत घाला .
 2. भिजल्यावर पाणी काढून एका कापडात घट्ट बांधून ठेवा .
 3. सगळे साहित्य जमवून घ्या.
 4. मोड आलेले मूग मटकी ,,मिरची कोथिंबीर मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या .जाडसर वाटले कि चविष्ट लागतात .
 5. ओट्स तव्यावर थोडे भाजून घ्या .थोडारंग बदलायला कि थंड करून मिक्सरमधून फिरवून घ्या.
 6. मूग , मटकीच्या मिश्रणात बटाटा कुस्करून टाका , ओट्स चे पीठ घाला ,कांदा ,अद्रक लसूण पेस्ट ,बारीक चिरलेला गाजर ,हळद ,मीठ ,चाट मसाला घालून छान मळून घ्या
 7. तुम्हाला भिजवतांना पाणी लागणारच नाही कारण मूग आणि मटकी मिक्सरमधून काढल्यावर त्यात ओलावा येतो .
 8. मळलेल्या उंड्याचे छोटे छोटे गोळे करा .आणि तळहातावर प्रेस करून त्याला टिक्की सारखा आकार द्या .
 9. थोडं तेल टाकून नॉनस्टिक तव्यावर दोन्ही बाजूनी भाजून घ्या .नॉनस्टिक तव्याचा वापर केल्यामुळे तेल कमी लागत .आणि पदार्थ जास्त ऑईली होत नाही.
 10. खरपूस भाजून घ्या . सॉस बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर