मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणी कुकीज

Photo of Nachani kukij by Shilpa Deshmukh at BetterButter
1141
8
0.0(0)
0

नाचणी कुकीज

Mar-11-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणी कुकीज कृती बद्दल

आपण बिस्कीट ,कुकीज ,ब्रेड रोजच मुलांना देतो .प्रत्येक घरात हे पदार्थ जणू गरजेच्या पौष्टिक पदार्थासारखी आणली जातात .महिन्याला किती मैदा आपल्या पोटात जातो .याचा आपण विचार करत नाही .जर आपण बिस्कीट किंवा नाचणीपासून बनवलेली खाल्ली तर कोणतेच साईड इफेक्ट होणार नाही .राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात.आज नाचणीच्या कुकीज ची रेसिपी सांगते आहे मी यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे शिवाय शुध्ध गायीचे तूप वापरले आहे त्यामुळे हे कुकीज पौष्टिक आहेच पण गुळामुळे एक नैसर्गिक चव त्याला मिळाली आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी नाचणी पीठ
  2. 1/4 वाटी कणिक
  3. 1/2 वाटी गूळ किसून किंवा पवाडर
  4. गाईचे तूप 1/4 कप
  5. बेकिंग पावडर 1/2 tbsp
  6. बेकिंग सोडा 1/2 tbsp
  7. बदाम 5-6
  8. वेलची पावडर 1 tbsp
  9. दूध 4 चमचे
  10. बदाम

सूचना

  1. सगळे साहित्य जमवून घ्या .नाचणीला कधीही कीड लागत नाही. दोन-तीन वर्षांचे नाचणीचे धान्य स्वादासकट चांगले टिकते. नाचणीचे सत्त्व पूर्वी घरोघर लहान बालकांना देण्यात यायचे नाचणी पित्तशामक, थंड, तृप्तीकारक व रक्तातील तीक्ष्ण, उष्ण हे फाजील दोष कमी करते
  2. दोन्ही पीठ आणि गूळ एकजीव होईपर्यंत मिक्स करा . हाताने दाबल्यावर गोळा होईल इतपत मिक्स करा .
  3. आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घाला मिक्स करा .
  4. तूप घालून मळून घ्या ,वेलची पावडर आणि थोडं थोडं दूध घालून पिठाचा गोळा घट्ट बनेल इतपत हातानी मळून घ्या.
  5. गुळाला पाणी सुटतं त्यामुळे दूध घालतांना एकदम घाई करू नका आवश्यक तेवढेच घाला.
  6. उंड्याचे छोटे छोटे गोळे पेठ्याप्रमाणे करून वरून थोडं प्रेस करून बेकिंग ट्रे मध्ये ठेवा.
  7. मायक्रोवेव्ह 180° प्रीहीट करा
  8. वरून बदामाचे काप चिपकवा .
  9. 20 मिनिट सेट करून बेक करायला ठेवा .ट्रेमध्ये बिस्कीट किंवा कुकीज ठेवतांना आजूबाजूला थोडी मोकळी जागा असू द्या .
  10. कारण कुकीज बेक होतांना त्यांचं आकारमान वाढतं .
  11. वरील कुकीज आणि बेक झालेल्या यामध्ये तुम्हाला फरक दिसेल .दुपटीने मोठ्या होतात .
  12. वीस मिनिटांनी कुकीज बाहेर काढा आणि पौष्टिक नाचणी कुकीजचा आनंद घ्या.
  13. हे बघा खालच्या बाजूनेही खूप छान बेक झाल्या.
  14. चवीला अप्रतिम आणि पौष्टिकही शिवाय तिन्ही दोषांचे निवारण करते .
  15. आजारी माणसाला आणि लहान मुलांना नाचणीचे पदार्थ पचायला खूप हलके आणि पौष्टिक असतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर