मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो सूप

Photo of Tomato soup by Ajinkya Shende at BetterButter
813
8
0.0(0)
0

टोमॅटो सूप

Mar-11-2018
Ajinkya Shende
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो सूप कृती बद्दल

टोमॅटो सूप हा सूप मधला रीच,क्रीमी आणि हेल्दी प्रकार आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ मध्यम आकाराचे टोमॅटो
  2. १ लहान गाजर
  3. २ लंवंग,२ काळीमीरी व छोटा तुकडा दालचीनी
  4. अर्धा चमचा तूप
  5. पाव चमचा धणा जीरा पावडर
  6. पाव चमचा लाल मिर्ची पावडर
  7. पाव चमचा साखर
  8. चवीप्रमाणे मीठ
  9. १ चमचा मैद्यामधे अर्धा कप पाणी टाकून केलेली मैद्याची पेस्ट
  10. सजावटीसाठी तुपात तळलेले ब्राऊन ब्रेडचे तुकडे,फ्रेश क्रीम व कोथिम्बीर

सूचना

  1. प्रथम टोमॅटोला चिरा देवून त्यात लवंग,काळी मीरी व दालचीनी त्यात भरून व गाजराची साल काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करुन टोमॅटो व गाजर पाण्यात टोमॅटो ची साल निघेपर्यंत उकळवुन घ्यावे किंवा अवन मधे हाय पॉवर ला ४ मिनिट माइक्रोवेव करुन घ्यावे.
  2. नंतर टोमॅटो ची साल काढून थंड झाल्यावर मिक्सर मधे गाजर व टोमॅटोची स्मूथ पेस्ट करुन घ्यावी व गाळून घ्यावी.
  3. नंतर एका पॅन मधे १ चमचा साजुक तुप टाकून ही पेस्ट तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवुन घ्यावी.
  4. नंतर त्यात पाऊण ग्लास पाणी,लाल मिर्ची पावडर,धणा जीरा पावडर,मीठ व साखर टाकून एक ऊकळी येऊ द्यावी.
  5. नंतर त्यात मैद्याची पेस्ट टाकून सूप २-३ मिनिट ऊकळवुन घ्यावे.
  6. तयार सूप सर्विंग बाऊल मधे काढून वरून फ्रेश क्रीम व कोथिम्बीर टाकून गार्निश करावे व तुपात तळलेल्या ब्राऊन ब्रेड सोबत गरम टोमॅटो सूप सर्व करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर