मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर बॉम्ब

Photo of Paneer bomb with twist by Swati Kolhe at BetterButter
591
8
0.0(0)
0

पनीर बॉम्ब

Mar-12-2018
Swati Kolhe
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर बॉम्ब कृती बद्दल

पनीर:(५० ग्राम प्रमाणे ) कॅलरी- १३२.५, फॅट- १०.४g g, कार्बोहैड्रेट- ०.६g, प्रोटीन- ९.२g आणि जर गायीच्या दुधापासून पनीर बनवले तर कॅलरी- २६५, फॅट- २१g g, कार्बोहैड्रेट- १g, प्रोटीन- १८g गहू:(१०० ग्राम प्रमाणे) कॅलरी- ३३९g, फॅट- २.५ g, पोट्याशियम- ४३१mg, कार्बोहैड्रेट- ७१g, प्रोटीन- १४g, कॅल्शिअम- ३%, आयर्न- १९%, व्हिटामिन B6-२०%, म्याग्नेशिम- ३६% पालक:(१०० ग्राम प्रमाणे) कॅलरी- २३g, सोडियम- ७९g, पोट्याशियम- ५५८mg, कार्बोहैड्रेट- ३.६g, प्रोटीन- २.९g, कॅल्शिअम- ९%, आयर्न- १५%, व्हिटामिन B, व्हिटामिन B6- २०%, व्हिटामिन A- १८७%, व्हिटामिन C- ४६%

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. पालकाची पान ३०-३५
  2. पनीर २०० ग्राम
  3. शेवया १०० ग्राम
  4. उकडलेला बटाटा २-३
  5. हिरवी मिरची पेस्ट २ tsp
  6. अद्रक-लसूण पेस्ट २ tsp
  7. लाल मिरची पावडर १ tsp
  8. गरम मसाला २ tsp
  9. चाट मसाला २ tsp
  10. आमचूर २tsp
  11. जिरेपूड १ tsp
  12. मीठ चवीनुसार
  13. तेल

सूचना

  1. प्रथम पालकाची पेस्ट करून घ्या.
  2. नूडल उकळून घ्या.(नूडल उकळताना त्यात १/२ tsp मीठ आणि तेल घालावे आणि नंतर चाळणीत सुटसुटीत काढून निथळत ठेवा, म्हणजे ते चिटकत नाहीत.)
  3. बाउल मध्ये उकडलेला बटाटा, पालक पेस्ट, नूडल घेऊन त्यात हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, १/२ tsp लाल मिरची, गरम मसाला, चाट मसाला, आमचूर प्रत्येकी १/२ घ्यावा, जिरेपूड थोडं मीठ घालून कणिक मळतो तसे चांगले मळून घ्या.(टीप१)
  4. दुसऱ्या बाउल मध्ये पनीर चे छोटे तुकडे करून त्याला फोर्क ने छिद्र पाडून घ्या. मग त्यात उरलेले सगळे मसाले, मीठ घालून मिक्स करून पनीर १०-१५ मिनीट मॅरीनेट करायला ठेवा.(टीप१)
  5. १५ मिनिटानंतर पालक,नूडलचा लिंबा एवढा गोळा घेऊन त्याची पारी बनवा हातानेच, मग त्यात पनीर चा १ तुकडा भरून पारी बंद करून बॉल चा आकार द्या. अश्या प्रकारे सगळे बॉल्स/ बॉम्ब बनवून घ्या.
  6. हे बॉम्ब तुम्ही डीप किंवा शॅलो फ्राय करू शकता. बेक केले तर आणखीच छान.
  7. टीप:
  8. १ वर दिलेले मसाले अर्धे पालकांच्या मिश्रणात आणि अर्धे पनीर मध्ये घालायचे आहे
  9. आवडत असल्यास ब्रेड crumb चे कोटिंग दिले तरी चालते
  10. वेळ नसेल तेव्हा, पालक चिरून घातला तरी चालते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर