मुंबई पाव भाजी | Mumbai Pav Bhaji Recipe in Marathi

प्रेषक Anjana Chaturvedi  |  30th Jul 2015  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Mumbai Pav Bhaji by Anjana Chaturvedi at BetterButter
मुंबई पाव भाजी by Anjana Chaturvedi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5646

1

Video for key ingredients

  मुंबई पाव भाजी

  मुंबई पाव भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mumbai Pav Bhaji Recipe in Marathi )

  • 4 टोमॅटोची प्युरी
  • 2 बटाटे
  • 275 ग्रॅम्स दुधी
  • 1/2 गाजर
  • 250 ग्रॅम्स जांभळ्या रंगाची कोबी
  • 2 लहान भोपळी मिरच्या
  • 1/3 वाटी शिजवलेले हिरवे वाटाणे
  • 1 मोठा चमचा किसलेले आले
  • 3 मोठे चमचे ताजी कोथिंबीर
  • 2 मोठे चमचे लिंबाचा रस
  • दीड कप पाणी
  • 4 मोठे चमचे लोणी
  • 1 मोठा चमचा खाण्याचे तेल
  • 1 लहान चमचा हळद
  • अडीच चमचे काश्मिरी मिरची/देगी मिरची पावडर
  • 3 मोठे चमचे पावभाजी मसाला
  • 1/4 लहान चमचा काळे मीठ
  • मीठ स्वादानुसार

  मुंबई पाव भाजी | How to make Mumbai Pav Bhaji Recipe in Marathi

  1. बटाटे, दुधी यांना सोला आणि कापा. गाजर किसा. भोपळा मिरच्या, कोबी आणि फ्लॉवरचे लहान तुकडे करा.
  2. सर्व भाज्यांना दीड कप पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये 4-5 शिट्या होईपर्यंत शिजवा (भोपळा मिरची व्यतिरिक्त). थंड झाल्यानंतर बटाट्याच्या मॅशरने मॅश करा.
  3. एका कढईत तेल गरम करा, लोणी आणि चिरलेली भोपळा मिरची मध्यम आचेवर परता.
  4. त्यात किसलेले आले आणि टोमॅटोची प्युरी घाला. मध्यम आचेवर झाकून शिजवा.
  5. 1 मोठा चमचा लोणी घाला, शिजलेले हिरवे वाटाणे, सर्व कोरडे मसाले घाला. तेल कडा सोडेपर्यंत परता.
  6. आता त्यात मॅश केलेल्या भाज्या घालून चांगले हलवा. घनता नीट करा. आता झाका आणि 10 मिनिटांसाठी मंद आचेवर उकलण्यासाठी ठेवा.
  7. पाव कुरकुरीत होईपर्यंत भाजा आणि गरमागरम भाजीबरोबर वाढा.

  My Tip:

  उत्कृष्ट स्वादासाठी पावभाजी मसाला घालायचे विसरू नका, एका चांगल्या ब्रॅन्डचा मसाला वापरा.

  Reviews for Mumbai Pav Bhaji Recipe in Marathi (1)

  tejswini dhopte2 years ago

  Wow
  Reply

  Cooked it ? Share your Photo