मुख्यपृष्ठ / पाककृती / सोया खिमा पराठा पॉकेट

Photo of Soya kheema paratha pochet by Swati Kolhe at BetterButter
583
7
0.0(0)
0

सोया खिमा पराठा पॉकेट

Mar-13-2018
Swati Kolhe
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोया खिमा पराठा पॉकेट कृती बद्दल

सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. अहारामध्ये सोयाबीनचा नियमीत वापर केल्याने हडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो. एका अभ्यासात असेही सांगितले आहे की, सोयाबीनमध्ये आईसोफ्लेवोंस नावाचे एक रसायन असते. हे रसायन इस्ट्रोजन हार्मोन सारखे असते. महिलांना ओस्टियोपोरोसिसपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे रेसायन फायदेशीर ठरते. सोयाबीनचे फायदे शोधन्यासाठी संशोधकांनी सुमारे २०० महिलांवर प्रयोग केले. या २०० महिलांना सहा महिन्यांपर्यंत सोयाबीन प्रोटीनयुक्त आहार दिला. त्यानंतर संशोधकांनी या महिलांच्या हाडांचे संशोधन केल्यास त्यांच्या हाडांमधे अधिक भक्कमपणा व नेहमीच्या तूलनेत अधी निरोगीपणा दिसून आला. फायदे: १ जर आपणास काही मानसीक अजार असेल तर आपल्या अहारात सोयाबीनचा जरूर समावेश करा. सोयाबीन मानसीक संतूलनावर प्रचंड प्रभावी असते. २ हृदयाच्या आजारवरही सोयाबीन फायदेशीर असते. हृदयाचा आजार असणाऱ्या लोकांनी सोयाबीनचा वापर अहारात करावा असा सल्ला डॉक्टरही देतात. ३  उच्च रक्तदाबावरही सोयाबीन फायदेशीर ठरते. जे लोक सोयाबीनचे नियमीतपणे सेवन करतात त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. ४ सोयाबीनपासून लेसीथिन मिळते जे आरोग्याला फारच फायदेशीर असते. ५ सोयाबीनपासून बनवलेले ताक प्यायल्याने पोटांचे विकार कमी होतात. महत्वाची टीप : गरोदर महिलांनी सोयाबीनचे खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. सारण बनवण्यासाठी:
  2. सोयाबीन चुरा १ कप
  3. तेल १ १/२ tbsp
  4. हिंग १/८ tsp
  5. मोहरी १/२ tsp
  6. अद्रक-लसून पेस्ट १ १/२ tsp
  7. मिरची पेस्ट १ tsp
  8. चिरलेले कांदे २
  9. मिरची पावडर १ tsp
  10. चिरलेला टोमॅटो २
  11. हळद १/४ tsp
  12. धने जिरेपूड २ tsp
  13. गरम मसाला १ tsp
  14. आमचूर १/२ tsp
  15. कसुरी मेथी चिमूटभर
  16. ऑरेंगानो १/२ tsp (ऑप्शनल)
  17. चीज १/४ कप (ऑप्शनल)
  18. मीठ चवीनुसार
  19. पराठा बनवण्यासाठी:
  20. कणिक+मैदा १ कप
  21. मीठ चवीनुसार
  22. तेल १ tsp
  23. बटर/तेल शेकण्यासाठी

सूचना

  1. प्रथम सोयाबीन चा चुरा २-३ पाण्याने धुवून घेऊन स्वछ पाण्यात भिजत घाला.
  2. पराठ्याची कणिक दिलेले साहित्य वापरून मध्यम कणिक मळून जाळून ठेवा.
  3. सारण तयार करण्यासाठी लोखंडी कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, अद्रक-लसूण मीरची पेस्ट परतून घ्या.
  4. मग कांदा गुलाबी परतून घ्या. कांडा झाला की हळद लाल तिखट परतून घ्या.
  5. टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
  6. नंतर धने जिरेपूड, गरम मसाला, आमचूर, मीठ घालून पसरतवा.
  7. शेवटी सोयाबीन चा चुरा निथळून घाला व मिठाचा अंदाज घेऊन परतवून घ्या.
  8. पराठा बनवताना पुराण पोळी जशी भरतो तसे सारण भरून वरून थोडे ऑरेंगानो आणि चीज घालून पराठा अलगद लाटून घ्या.
  9. दोन्ही बाजूनी बटर/तेल लावून खरपूस भाजून घ्या.
  10. पराठा चौकोनी बनवला तर पॉकेट चा आकार पॉकेट सारखा येतो. आणि गोल लाटला तर पिझ्झा सारखा होतो. आवड तुमची.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर