मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन क्रीम / पॉईसोन द क्रीम

Photo of Chiken cream / poisson de cream by Aarti Nijapkar at BetterButter
0
4
0(0)
0

चिकन क्रीम / पॉईसोन द क्रीम

Mar-13-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन क्रीम / पॉईसोन द क्रीम कृती बद्दल

ही एक फ्रेंच पाककृती आहे तर चिकन ला पॉईसोन असे म्हणतात , चिकन ला १० ते १५ मिनिटे मॅरीनेशन करून ठेवून मग आपण बेशमेल सॉस म्हणजेच पांढरा सॉस बनवून त्यात काही फळ भाज्या घालून ही पाककृती पार्टी साठी बनवणार आहोत

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • फ्रेंच
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. चिकन मरीनेशन
  2. चिकन बोनलेस ५०० ग्रॅम
  3. मीठ १ लहान चमचा
  4. आलं लसूण पेस्ट १ लहान चमचा
  5. बेशमेल सॉस साठी
  6. बटर २ मोठे चमचे
  7. मैदा १ मोठा चमचा
  8. दूध १ कप
  9. मीठ १/४ लहान चमचा
  10. काळीमिरी कुटलेली २
  11. फ्रेश क्रीम २ मोठे चमचे
  12. भाज्या
  13. हिरवे वाटाणे / मटार १/४ कप
  14. गाजर १/३ कप

सूचना

  1. चिकनच्या तुकड्यांना मरीनेशन करून ठेवून घ्या
  2. एक पॅन मध्ये थोडं तेल घालून चिकनचे तुकडे मध्यम आचेवर फ्राय करून घ्या
  3. आता आपण बेशमेल सॉस बनवून घेऊ
  4. दूध तापवून कोमट करत ठेवून द्या
  5. पॅन तापवून त्यात बटर घालून विरघळवून घ्या मग मैदा घालून मंद आचेवर परतवून घ्या रंग बदलू नये ह्याची काळजी घ्यावी
  6. कोमट झालेले दूध थोडे थोडे करत न थांबता ओतत राहा व सातत्याने व्हिस्क ने ढवळत राहा नाहीतर गुठळ्या होतील व्हिस्क एकाच दिशेने ढवळत राहा
  7. चांगली उकळी येऊ ध्या सातत्याने ढवळत राहा पॅन ला चिटकणार नाही
  8. आता काळीमिरी व मीठ चवीनुसार घाला आणि आच बंद करा
  9. आता गाजर क्यूब मध्ये कापलेले व मटार ह्यांना वाफेवर थोडं शिजवून घ्या किंवा ब्लाँच करा जास्त शिजवायचे नाही आहे
  10. गाजर व मटार बटर मध्ये थोडे टॉस करून घ्या व बेशमेल सॉस मध्ये एकजीव करून घ्या
  11. एका थाळीत फ्राय चिकनचे तुकडे व्यवस्थित ठेवून घ्या व तयार सॉस त्यावर घालुन घ्या
  12. गरमागरम खाऊन घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर