BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक चवळी कबाब रोल

Photo of Spinach bean kabab roll by Swati Kolhe at BetterButter
288
6
0(0)
0

पालक चवळी कबाब रोल

Mar-15-2018
Swati Kolhe
20 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक चवळी कबाब रोल कृती बद्दल

कबाब तसे बऱ्याच प्रकारे बनवले जाते. भाज्यांचे, पनीरचे, चिकन, मटण, काबुली चणेचे फलाफल स्वरूपात ते देशाबाहेर फेमस आहे. त्यात ही काही नवीन इनोव्हेटिव्ह असावं म्हणून मी चवळी आणि पालकाचे कबाब बनवून बघितले. आणि त्याचा कबाब रोल बनवून खाऊ घातला. अक्षरशः कोणालाही कळले नाही की ते चवळी पासून बनवले आहे. पार्टी साठी ऑप्शन म्हणून हा एक चांगला ऑप्शन आहे. कबाब, पराठे, चटणी बनवून ठेवायचे. ऐन वेळी रोल बनवून सर्व्ह करावे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किटी पार्टी
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • अॅपिटायजर
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. भिजवलेली चवळी १ कप
 2. पालकाची पान २०-२५
 3. अद्रक १ tbsp
 4. मिरची ४-५
 5. जिरं १ tsp
 6. ओवा १/२ tsp
 7. गरम मसाला १ tsp
 8. धणेपूड १/२ tsp
 9. आमचूर १/२ tsp
 10. मिरची पावडर १ tsp
 11. कोथिंबीर १/२ कप
 12. मीठ चवीनुसार
 13. रोल बनवण्यासाठी
 14. पराठे आवश्यकतेनुसार
 15. दही पुदिना चटणी
 16. कांदा, कोबी, गाजर, टोमॅटो आवश्यकतेनुसार
 17. टोमॅटो सॉस आवश्यकतेनुसार

सूचना

 1. रात्रभर भिजवलेली चवळी सकाळी उपसून घ्यावी. पालक चंगला धुवून घ्यावा.
 2. कुकर मध्ये चवळी, पालकाची पान आणि चवळी शिजेल एवढेच पाणी घालून २-३ शिट्या काढून घ्या.
 3. कुकर थंड झाल्यावर चवळी, पालकमध्ये पाणी शिल्लक राहिल्यास ते काढून घ्यावं.
 4. मिक्सरच्या भांड्यात चवळी, अद्रक, मिरची, जिरं सरबरीत वाटून घ्यावयाचे.
 5. मोठ्या बाउलमध्ये चळवळीचे वाटण, सर्व मसाले, कोथिंबीर व मीठ घालून छान एकजीव करावे मिश्रण.
 6. मिश्रण थोडे ओलसर वाटल्यास वरून १-२ tbsp बेसन पीठ घालून गोळा तयार करून घ्यावा.
 7. आता मिश्रणाचे हव्या तेवढ्या आकाराचे कबाब वळून घ्यावे आणि तव्यावर थोड्या तेलात फ्राय करून घ्यावे.(डीप फ्राय चालतील)
 8. रोल बनवण्यासाठी पराठा घेऊन त्यावर दही पुदिना चटणी लावून वरून कबाब ठेवावे व कांदा, कोबी ने सजवावे.
 9. अशा प्रकारे सर्व रोल बनवून घ्यावे. व टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावे.
 10. टीप:
 11. पराठे आणि कबाब बनवून ठेवायचे पार्टीत ऐन वेळी पराठे थोडे गरम करून बनवले की छान गरम गरम सर्व्ह करता येते.(time management :stuck_out_tongue_winking_eye:)

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर