मुख्यपृष्ठ / पाककृती / फणसाची खीर

Photo of Jackfruit Kheer by Swati Kolhe at BetterButter
1211
7
0.0(0)
0

फणसाची खीर

Mar-15-2018
Swati Kolhe
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फणसाची खीर कृती बद्दल

पिकलेला फणस शीतल, स्निग्ध, तृप्तीदायक, मधुर गुणात्मक, मांसवर्धक व बलदायक असतो. फणसाचे गर व आठळ्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, कॅरोटिन, थायमीन रिबोफ्लेविन, नायसिन व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते तसेच प्रथिने, मेद, खनिजे, आद्र्रता, तंतुमय, पिष्टमय पदार्थही असतात. या सर्व गुणधर्मामुळे शरीर संवर्धनासाठी, पचनशक्ती वाढविण्यासाठी फणसाचा उपयोग होतो. आज आपण या फळाचे काही गुणकारी गुणधर्म जाणून घेऊ १. फणसात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. विटॅमीन ए, सी, थायमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह यांचा फणसात मोठ्या प्रमाणात समावेश असतो. २. पिकलेल्या फणसाचा पल्प करुन तो पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास ताजेतवाने तर वाटतेच, पण हृदयाचे विकार जडलेल्या व्यक्तींना त्याचा फायदाही होतो. ३. फणसात मोठ्या प्रमाणावर असणारे पोटॅशिअम रक्तदाब कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयावरील अनेक समस्यांवर उपायकारक ठरू शकतो. ४. भरपूर प्रमाणात लोह असल्याने अॅनिमियासारख्या विकारांवर फणस खाणे फायद्याचं ठरतं. ५. थायरॉइडचा त्रास असणाऱ्या लोकांनी फणस खाणे फायद्याचे आहे. यात असलेले खनिज आणि तांबे थायरॉइड नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. ६. हाडांसाठी फणस खाणे खूप गुणकारी असते. या फळात असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शिअम हाडांसाठी गुणकारी असते. ७. फणसात असलेले विटॅमीन ए आणि सी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका यामुळे कमी होऊ शकतो. ८. फणसात असणारे विटॅमीन ए डोळ्यांची शक्ती चांगली ठेवते. तसेच त्वचा उजळण्यासाठीसुद्धा तो फायदेशीर ठरते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  •  केरळ
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. बिया काढलेले फणसाचे गरे २५० ग्राम
  2. गूळ १/२ कप
  3. नारळाचे घट्ट दूध ३/४ कप
  4. तूप १ १/२ tbsp
  5. खोबरे काप १ tbsp
  6. काजू तुकडा २ tbsp
  7. मनुका २ tsp
  8. वेलची पूड १/८ tsp

सूचना

  1. फणसाचे गरे मिक्सर मध्ये घालून त्याची पेस्ट कसरून घ्या.
  2. गुळामध्ये बुडेल एवढेच पाणी घालून त्याचे पाणी करून व गाळून घ्या.
  3. पॅनमध्ये १ tsp तूप गरम करून त्यात खोबरे काप, काजू आणि मनुका फ्राय करून काढून घ्या.
  4. त्याच पॅनमध्ये गुळाचे पाणी, तूप आणि फणसाची पेस्ट घालून पाणी आटून कडा सुटे पर्यंत फ्राय करा.
  5. नारळाचे दूध घालून काहीच मिनिट ढवळून गॅस उतरवून घावे(टीप)
  6. शेवटी फ्राय केलेले काजू, मनुका, खोबरे काप व -वेलचीपूद घालावे.
  7. टीप:
  8. फणसाचे गरे जास्त पिकलेले असेल तर डायरेक्ट त्याचा गर करता येतो. जर पिकलेले नसेल तर पॅनमध्ये १ tsp तूप व पाणी घालून फ्राय करा. वेळ वाचवण्यासाठी कुकर मध्ये १ शिटी काढून घहेत येते.
  9. नारळाचे दूध घातल्यावर जास्त वेळ गॅस वॉर ठेऊ नये, नाहीतर दूध फाटते.
  10. फक्त साधे दूध घालणार असाल तर ते थोडे गाढ करून घालावे छान घट्टसर खीर होते.
  11. आमच्या बाजूला मद्रासी फॅमिली राहते, त्यांच्या अक्षरशः एक ते दीड वर्ष पाठी लागून शेवटी त्यांनी शिकवली.... हुश्श...:blush:
  12. सध्या माझ्याकडे फोटो नव्हता म्हणून अंदाजसाठी नेट वरील फोटो दिला आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर