मसालेभात पुदिना चटणी | MASALEBHAT pudina chutney Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  17th Mar 2018  |  
3 from 1 review Rate It!
 • Photo of MASALEBHAT pudina chutney by Chayya Bari at BetterButter
मसालेभात पुदिना चटणीby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

1

मसालेभात पुदिना चटणी recipe

मसालेभात पुदिना चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MASALEBHAT pudina chutney Recipe in Marathi )

 • तांदूळ २वाट्या
 • तेल
 • जिरे,मोहरी,हिंग
 • तेजपान,लवंग,मिरे ५,५
 • दालचिनी २तुकडे
 • तिखट २चमचे
 • गरम मसाला पूड१/२चमचा किंवा काळा मसाला
 • शेंगदाणे भाजून सोललेले
 • खोबरे काप
 • कांदा १
 • बटाटा मोठा १
 • मटार दाणे १वाटी
 • कोथिंबीर व खोबरे किस सजावट
 • चटणीसाठी
 • पुदीना पाने ५वाट्या
 • गूळ आवडीप्रमाणे किंवा पाव वाटी
 • कैरी १ ,खोबरे किस
 • मीठ,लसूण ,हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे

मसालेभात पुदिना चटणी | How to make MASALEBHAT pudina chutney Recipe in Marathi

 1. प्रथम तयारीत कांदा कापून,बटाटा कापून व मटार धुवून घेतले तांदूळ धुवून निथळत ठेवले पाणी उकळले
 2. मग तेल तापवून जिरे,मोहरी हिंग घातले तेजपान खडा मसाला घातला शेंगदाणे खोबरे परतले मग कांदा लालसर परतला
 3. मग बटाटा,मटार दाणे घातले परतून हळद,तिखट,मीठ गरम मसाला घाला तो भाज्यात मिक्स झाला
 4. आता तांदूळ घालून ५मिनिटे परतले या उकळते पाणी अंदाजाने घातले
 5. ५मिनिटाने हलवून गॅस मध्यम ठेवला
 6. परत हलवून बारीक गॅसवर झाकण घालून भात शिजवला मधून हलविले
 7. चटणीसाठी पुदिना धुवून त्यात कैरीचे तुकडे लसूण हिरवी मिरची खोबरे किस घेऊन बारीक केले व मीठ आणि गूळ मिक्स केला चटणी तयार

My Tip:

उन्हाळयात थंड पुदीण्याची चटणी आहारात अवश्य असावी

Reviews for MASALEBHAT pudina chutney Recipe in Marathi (1)

Maya Ghuse2 years ago

My fav.
Reply