BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बटर चिकन बिर्याणी

Photo of Butter Chicken Biryani by Geeta Koshti at BetterButter
3
8
0(0)
0

बटर चिकन बिर्याणी

Mar-19-2018
Geeta Koshti
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटर चिकन बिर्याणी कृती बद्दल

पार्टीसाठी स्पेशल भातातला प्रकार बिर्याणी

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. चिकन 1/2 किलो
  2. १ किलो बिर्याणी बासमती तांदूळ
  3. बटर / तेल
  4. कांदे बारीक ऊभे चिरून
  5. मध्यम २ कांदे , टोमॅटो बारीक चिरून
  6. ६ लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून
  7. २ चमचे किसलेले आले
  8. चिकन लांबट कापून घेणे( हे चिकन ब्रेस्ट च्या आतील बाजूस असलेले मांस….काही सुपर स्टोर्स मध्ये उपलब्ध असते.)
  9. १ चमचा लाल तिखट
  10. १ चमचा जिरेपूड , २ चमचे धने पूड
  11. अर्धा चमचा दालचिनी पूड
  12. अर्धा चमचा हळद
  13. ३/४ कप साधे दही
  14. तेजपान २
  15. केसर चिमुटभर
  16. केसर नसेलतर केशरी रंग पण चालेल
  17. शान बॅम्बे बिर्याणी मसाला १ पॅकेट

सूचना

  1. तांदूळ धुवून घ्यावेत व थोड्या पाण्यात मीठ घालून ३० मिनिटे भिजू द्यावेत
  2. त्यानंतर तांदळातील पाणी निथळून त्यांना एका पातेल्यात पाण्यात बुडवून ठेवावे.
  3. पाणी तांदळाच्या वर असावे. आता हे तांदूळ घातलेले पातेले तापत ठेवावे.
  4. पाण्याला उकळी आली कि मंद आंचेवर झाकून भात १० मिनिटे शिजू द्यावा
  5. ऊभा कांदा तेलात तळुन घ्या
  6. आता फ्राईंग पॅन मध्ये बटर घाला त्यात चिरलेले छोटे कांदे ,लसूण आणि आले टोमॅटो घालून सोनेरी रंगावर परता.
  7. आता चिकन घालून ते ४ मिनिटे परता शान बॅम्बे बिर्याणी मसाला घालून सर्व मसाले १ मिनिट परता . आता त्यात दही मिसळून १-२ मिनिटे मंद आचेवर ठेवावे
  8. थोडेच पाणि घालून चिकन थोडे शिजवून घ्या.
  9. आता त्यात अर्धवट शिजलेला भात मिसळा. आता हे पॅन स्वच्छ टी टॉवेल ने झाकून त्यावर घट्ट झाकण लावावे.
  10. यामुळे वाफ आतच राहिल अशा रीतीने १० मिनिटे मंद आंचेवर शिजू द्यावे दुधात केसर घालून त्यावर ते घालून घ्या बटर पण घाला
  11. गॅस बंद करून ५ मिनिटे तसेच राहू द्यावे. बाजूला काढून ठेवलेल्या कांद्याच्या मिश्रणाने सजवून बिर्याणी सर्व्ह करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर