मुख्यपृष्ठ / पाककृती / सुरमई मसाला फ्राय

Photo of Surmai masala fry by Aarti Nijapkar at BetterButter
1062
4
0.0(0)
0

सुरमई मसाला फ्राय

Mar-22-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुरमई मसाला फ्राय कृती बद्दल

मासे म्हंटले की सुरमई आलीच पाहिजे मग ते फ्राय करा किंवा रस्यातली करा पण आपण पार्टी साठी खास बनवणार आहोत म्हणून आज सुरमई फ्राय करूया म्हणजे पार्टीचा आनंद अजून वाढवता येईल

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. सुरमई मासे ६ ते ८ तुकडे
  2. आलं बारीक चिरलेले १ मोठा चमचा
  3. लसूण बारीक चिरलेली १ मोठा चमचा
  4. कोथिंबीर बारीक चिरलेली १ लहान चमचा
  5. पांढरे तीळ १/२ लहान चमचा
  6. लाल तिखट २ मोठे चमचे
  7. हळद १ लहान चमचा
  8. गरम मसाला १ लहान चमचा
  9. धने जिरे पावडर १ लहान चमचा
  10. लिंबाचा रस १ लहान चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. तांदळाचं पीठ २ मोठे चमचे
  13. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. सुरमई मासे साफ करून धुवून घ्या मग त्याला थोडे मीठ व लिंबाचा रस चोळून घ्या व बाजूला ५ मिनिटे ठेऊन द्या
  2. आता बारीक चिरलेली कोथिंबीर , लसूण ,आलं ,लाल तिखट , धने जिरे पावडर , हळद ,गरम मसाला , पांढरे तीळ, चवीनुसार मीठ व तांदळाचे पीठ एकत्र करू घ्या
  3. प्रत्येकी तुकड्यांना हा मसाला लावून घ्या व बाजूला ठेवा
  4. आता तवा गॅस वर ठेवून तेल घाला व तापवून घ्या मग मध्यम आच करून मसाला लावलेले मासे तव्यावर अलगद ठेवा व दोन्ही बाजूने चांगले फ्राय करून घ्या
  5. गरमागरम सुरमई मसाला फ्राय तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर