आलू मटर | Aloo matar Recipe in Marathi

प्रेषक Ajinkya Shende  |  22nd Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Aloo matar by Ajinkya Shende at BetterButter
आलू मटरby Ajinkya Shende
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

आलू मटर recipe

आलू मटर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aloo matar Recipe in Marathi )

 • ५ मध्यम अकाराचे उकडलेले बटाटे
 • २ मोठे बारीक कापलेले कांदे
 • ३ मध्यम आकाराच्या टोमॅटो ची प्यूरी
 • १ वाटी ब्लांच केलेले ताजे हीरवे वाटाणे
 • तेल,हींग,जीरं
 • १ छोटा चमचा बारीक कापलेलं आलं
 • १ छोटा चमचा बारीक कापलेली हिरवी मिर्ची
 • २ चमचे काश्मीरी लाल मिर्ची पावडर
 • १ चमचा किचन किंग मसाला
 • अर्धा चमचा हळद
 • अर्धा चमचा धणा जीरा पावडर
 • अर्धा चमचा गरम मसाला
 • अर्धा चमचा आमचूर पावडर
 • मीठ चवीनुसार
 • बारीक कापलेली कोथिम्बीर
 • सजावटीसाठी कोथिम्बीर आणि आल्याचे पातळ उभे काप

आलू मटर | How to make Aloo matar Recipe in Marathi

 1. प्रथम पॅन मधे ४-५ चमचे तेल टाकून तेल तापल्यावर त्यात जीरं,आलं आणि हिरवी मिर्ची टाकून थोडं परतवुन घ्यावं.
 2. नंतर त्यात बारीक कापलेला कांदा टाकून कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतवुन घ्यावा.
 3. कांदा व्यवस्थित परतवुन झाल्यावर त्यात टोमॅटो प्यूरी टाकून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवुन घ्यावी.
 4. नंतर एका वाटीत पाणी घेवून त्यात गरम मसाला सोडून बाकी सर्व मसाले टाकून त्याची पेस्ट बनवुन घ्यावी व ही पेस्ट टाकून मसाले व्यवस्थित परतवुन घ्यावे.
 5. नंतर त्यात ब्लांच केलेले वाटाणे,कोथिम्बीर,चवीनुसार मीठ व थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
 6. नंतर त्यात उकडलेले बटाटे (हवे त्या आकारत कापुन),गरम मसाला,आमचूर पावडर व थोडं पाणी टाकून भाजी ३-४ मिनिट शिजवुन घ्यावी.
 7. तयार भाजी सर्विंग प्लेट/बाऊल मधे काढून वरुन कोथिम्बीर आणि आल्याचे काप टाकून भाजी गार्निश करावी.

My Tip:

भाजी रस्सा हवी असेल तर पाणी जास्त टाकून भाजी व्यवस्थित मेळ धरेपर्यंत शिजवुन घ्यावी.

Reviews for Aloo matar Recipe in Marathi (0)