मुख्यपृष्ठ / पाककृती / Cauliflower Dry Manchurian

Photo of Cauliflower Dry Manchurian by Nayana Palav at BetterButter
2
13
4.9(13)
0

Cauliflower Dry Manchurian

Mar-22-2018
Nayana Palav
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • डिनर पार्टी
 • चायनीज
 • फ्रायिंग
 • साईड डिश
 • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 4

 1. फुलकोबी २०० ग्राम
 2. मैदा १ कप
 3. कॉर्नस्टार्च १/४ कप
 4. मीठ चवीनुसार
 5. मिरी पावडर १ टीस्पून
 6. सोया सॉस २ टीस्पून
 7. तेल तळण्यासाठी
 8. आल बारीक कापलेले १ टीस्पून
 9. लसूण बारीक कापलेले १ टीस्पून
 10. हिरवी मिरची बारीक कापलेली १ टीस्पून
 11. लाल मिरची १
 12. कांदा १
 13. कांदयाची पात २ (२ कांदे)
 14. सिमला मिर्च १
 15. भरडलेली मिरी १ टीस्पून
 16. व्हिनेगर १ टीस्पून
 17. लाल चिली सॉस १ टेबलस्पून
 18. काश्मीरी मिरची पावडर १ टेबलस्पून
 19. पाणी आवश्यकतेनुसार.

सूचना

 1. फुलकोबी कापून त्याचे तुरे करा.
 2. हे तुरे धुवून घ्या.
 3. मैदा, कॉर्नस्टार्च, मिरी पावडर, मीठ, सोया सॉस एकत्र करून त्यात थोडे पाणी घाला.
 4. घट्ट भजीप्रमाणे मिश्रण हवे.
 5. फुलकोबीचे तुरे या मिश्रणात बुडवा.
 6. गॅसवर कढई गरम करत‌ ठेवा.
 7. त्यात तेल ओता.
 8. तेल तापले की तुरे तळून घ्या.
 9. लाइट ब्राउन कलर झाले की काढा.
 10. आणि परत तळून काढा, त्यामुळे तुरे कुरकुरीत होतात.
 11. तळलेले तुरे चाळणीत अथवा टीश्यू पेपरवर काढा.
 12. भाज्या चिरुन घ्या.
 13. मिरी क्रशर मध्ये क्रश करा.
 14. गॅसवर कढई गरम करत‌ ठेवा.
 15. त्यात तेल ओता.
 16. तेल तापले की लसूण घाला.
 17. आता आलं घाला.
 18. मिरच्या घाला.
 19. आता कांदा घाला.
 20. कांदा नीट परतून घ्या.
 21. सिमला मिरची घाला.
 22. नीट परतून घ्या.
 23. मीठ, व्हिनेगर, सोया सॉस, मिरपूड, तळलेले तुरे घाला.
 24. मिरची पावडर घाला.
 25. चिली सॉस, चिरलेली कांदा पात घाला.
 26. नीट परतून घ्या.
 27. तयार आहे तुमच्या पार्टीची शान वाढवण्यासाठी कुरकुरीत फुलकोबीचे सुके मांचूरीयन.

रिव्यूज (13)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
Mar-23-2018
Mahi Mohan kori   Mar-23-2018

Mastch....

Avinash Ashirgade
Mar-23-2018
Avinash Ashirgade   Mar-23-2018

1 नंबर स्नैक्स ....मस्त नी टेस्टी.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर