Photo of Veg Manchurian Ball's by Amruta Jadhav at BetterButter
1218
13
0.0(4)
0

Veg Manchurian Ball's

Mar-22-2018
Amruta Jadhav
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • चायनीज
  • पॅन फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 वाटी बारीक चिरलेला कोबी
  2. एक वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची
  3. पाव वाटी बारीक किसलेले गाजर
  4. 1 चमचा कॉर्नप्लोर
  5. 2 लसूण पाकळ्या बारीक चिरून
  6. 2 चमचे मैदा
  7. अर्धा चमचा हिरवी मिरची चिरून
  8. मीठ चवीनुसार
  9. काळी मिरी पावडर अर्धा चमचा
  10. तेल तळण्याकरीता
  11. ग्रेव्हीचे साहित्य पुढीलप्रमाणे
  12. अर्धा चमचा लसूण बारीक चिरून
  13. अर्धा चमचा सोया सॉस
  14. अर्धा चमचा रेड चिली सॉस
  15. अर्धा चमचा टोमॉटो सॉस
  16. पाणी अर्धा कप
  17. अर्धा चमचा किसलेले आल
  18. 1 कप पाण्यामध्ये अर्धा चमचा कॉर्नप्लोर पेस्ट
  19. 1 चमचा तेल
  20. 1 चिमूटभर साखर
  21. मीठ चवीनुसार

सूचना

  1. मंचुअरीयन बॉल्स साठी एका बाऊलमध्ये कोबी, गाजर, शिमला मिरची, मैदा, कॉर्नप्लोर, लसून, हिरवी मिरची, मीठ व मिरेपूड घेऊन एकञ करा.
  2. मिश्रणाचे लहान लहान गोळे करावे, गोळे तयार करताना त्यामध्ये पाणी घालू नये कारण मिश्रणामध्ये असणा्या भांज्याना पाणी सुटते, पण जर गोळे नीट होत नसतील तर त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडेसे पाणी घालावे.
  3. पँनमध्ये तेल गरम करून गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे.
  4. ग्रेव्हीची कृती एक कढईत तेल गरम करून त्यामध्ये लसून, हिरवी मिरची, सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॉटो सॉस, पाणी घालावे. हे मिश्रण मोठ्या आचेवर शिजवून घ्यावे.
  5. आता वरील मिश्रणात कॉर्नप्लोर घालावे. मिश्रण उकळू लागले की त्यामध्ये साखर, मीठ चवीनुसार घालावे.
  6. मिश्रण 2 मिनिटे शिजले की तयार केलेले मंचुअरीयन बॉल्स घालून 2- 3 मिनीट शिजवून घ्या.
  7. एका डिश मध्ये तयार बॉल्स घेऊन त्यावर गरम ग्रेव्ही टाकावी. आणि शेजवॉन चटणी सोबत सर्व्ह करावे.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
हर्षल जाधव
Mar-23-2018
हर्षल जाधव   Mar-23-2018

बेस्ट...

Namu Jadhav
Mar-22-2018
Namu Jadhav   Mar-22-2018

Quality

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर