BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर मसाला (डिनर डिश)

Photo of Paneer masala (dinner dish) by Swati Kolhe at BetterButter
352
8
0(0)
0

पनीर मसाला (डिनर डिश)

Mar-22-2018
Swati Kolhe
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर मसाला (डिनर डिश) कृती बद्दल

पनीर मसाला किंवा पनीर ची कोणतीही भाजी बनवणे काही नवीन नाही, पण हॉटेल ढाबा मध्ये जशी बेसिक ग्रेव्ही बनवून करतात तशीच बनवलेली ही रेसिपी आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • डिनर पार्टी
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. पनीर मॅरीनेट साठी:
 2. पनीर २५० ग्राम
 3. मिरची पावडर १ tsp
 4. गरम मसाला १ tsp
 5. हळद २ चिमूट
 6. मीठ चवीनुसार
 7. तेल १/४ tsp
 8. ग्रेव्हीसाठी:
 9. दालचिनी १"
 10. काळीमिरी ६
 11. लवंग ४
 12. वेलची १
 13. तेल १ १/२ tbsp
 14. कांदे ३ मोठे
 15. अद्रक १ "
 16. लसूण १०-१२ पाकळ्या
 17. लाल तिखट १/२ tbsp
 18. धने-जिरेपूड १ tsp
 19. टोमॅटो ३ मध्यम
 20. कोथिंबीर १ tbsp
 21. मीठ चवीनुसार
 22. भाजीच्या फोडणीसाठी:
 23. बटर १ tsp
 24. हिरवी मिरची २
 25. कांदा १ मध्यम
 26. कोथिंबीर २ tbsp

सूचना

 1. प्रथम पनीर मॅरीनेट करून घ्यायचे. पनीर, लाल तिखट, गरम मसाला, हळद, मीठ आणि तेल एकत्र करून ३० मिनिट साठी झाकून ठेऊन द्यावे.
 2. ग्रेव्ही बनवण्यासाठी:
 3. लोखंडी कढई मध्ये तेल तापवून त्यात दालचिनी, लवंग, मिरे व वेलची तडतडू द्यावी.
 4. मग त्यात कांदा गुलाबी परतून घ्यावा.
 5. अद्रक व लसूण पाकळ्या घालून २ मिनिट परतावे.
 6. मग लाल तिखट घालून तेल सुटू द्यावे
 7. टोमॅटो व कोथींबीर घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतावे.
 8. वरील मसाला थंड झाला की मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.
 9. पनीर फ्राय करण्यासाठी मॅरीनेट केलेले पनीर पॅन मध्ये फ्राय कसरून घ्यावे.(तेल घालण्याची आवश्यकता नाही मॅरीनेट मध्ये आधीच घातलेले आहे)
 10. भाजी बनवण्यासाठी:
 11. ग्रेव्ही बनवली त्याच कढई मध्ये बटर घेऊन त्यात हिरवी मिरची व कांदा परतून घ्यावा.
 12. कांदा गुलाबी झाला की त्यात ग्रेव्हीचे वाटण घालून १ मिनिट परतावे.
 13. व फ्राय केलेले पनीर आणि १/४ कप पाणी घालून हवी तशी ग्रेव्ही पातळ घट्ट करून घ्यावी.
 14. भाजी ला तेल सुटले की भाजी झाली म्हणून समजावी.
 15. वरून कोथींबीर ने सजवावी.
 16. सर्व्ह करताना पनीर मसाला, पापड, गाजर, गाजराचा झटपट हलवा आणि जीरा राईस सोबत सर्व्ह केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर