BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Mango Ice Cream

Photo of Mango Ice Cream by Archana Lokhande at BetterButter
7
9
0(0)
0

Mango Ice Cream

Mar-22-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Mango Ice Cream कृती बद्दल

पार्टी म्हटले की वेगवेगळे पदार्थ असतातच पण पार्टी आईस्क्रीम शिवाय अपूर्ण असते. म्हणजेच आईस्क्रीम पार्टीची जान असते... तर चला रेसिपीकडू....

रेसपी टैग

 • एग फ्री
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • इंडियन
 • ब्लेंडींग
 • चिलिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. दुध १/२ लीटर
 2. मँगो कस्टर्ड २ चमचे
 3. साखर ८ चमचे
 4. मँगो पल्प १ कप
 5. फ्रेश क्रिम १ कप
 6. थोडे काजू-बदाम काप

सूचना

 1. २-४ चमचे दुध बाजूला काढून बाकीचे सर्व दुध गरम करण्यास ठेवले.
 2. त्यातच साखर घालून साखर विरघळेपर्यंत आपण कस्टर्डमध्ये दुध घालून छान मिक्स करून घेतले.(गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी).
 3. साखर विरघळल्यावर त्यात कस्टर्डचे दुध घालून मिक्स करून पाच मिनिटे उकळवून गँस बंद केला.
 4. हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर मँगो पल्प आणि काजू-बदाम घालून छान मिक्स करून एक एअर टाईट कन्टेनर मध्ये घालून वरून फाँईल पेपर लावून झाकण बंद करून फ्रिजमध्ये ६ तास सेट होण्यास ठेवा.
 5. सहा तासांनी आईस्क्रीम बाहेर काढून मिक्सरवर किंवा इलेक्ट्रीक ब्लेंडरने मिक्स करा.
 6. नंतर त्यात फ्रेश क्रिम घालून पुन्हा मिक्स करून घ्यावे.
 7. हे मिश्रण कन्टेनरमध्ये ओतून वरून फाँईल पेपर लावून झाकण बंद करून ४ तास फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवले.
 8. ४-५ तासांनी आपली मँगो आईस्क्रीम तयार... आईस्क्रीम लहानपणापासून मोठ्यापयँत सर्वांना आवडीची...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर