मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक कोबी बॉल्स

Photo of Palak kobi balls by Aarti Nijapkar at BetterButter
477
6
0.0(0)
0

पालक कोबी बॉल्स

Mar-23-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक कोबी बॉल्स कृती बद्दल

पालक कोबी चे बॉल्स बनवत आहोत तर पार्टीचा आनंद घेता तर येणारच सोबत पौष्टिक खान ही होईल ...काहीतरी नवीन सुचलं आणि करून टाकले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पालक चिरलेली २ वाटी
  2. कोबी लांब चिरलेली १/२ वाटी
  3. कोथिंबीर २ मोठे चमचे
  4. हिरवी मिरची चिरलेली २
  5. बेसन १/३ वाटी किंवा आवश्यकतेनुसार
  6. ब्रेड क्रम्ब १/२ वाटी
  7. जिरे १ लहान चमचा
  8. गरम मसाला १ लहान चमचा
  9. लाल तिखट १ लहान चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. पालक स्वच्छ धुवून चिरून घ्या कोबी लांब पातळ चिरून घ्या
  2. एका बाउल मध्ये पालक, कोबी चिरलेली कोथिंबीर , हिरवी मिरची, बेसन , गरम मसाला ,लाल तिखट, चवीनुसार मीठ २ मोठे चमचे ब्रेड क्रम्ब घालून एकत्र करा मिश्रण एकजीव करून घ्या
  3. मग मध्यम आकाराचे गोळे करा व ब्रेड क्रम्ब मध्ये घोळवून घ्या व एक ताटात ठेवा
  4. कढईत तेल चांगलं तापवून घ्या मग आच मध्यम करून पालक कोबी बॉल्स टाळून घ्या दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या
  5. गरमागरम कुरकुरीत पालक कोबी बॉल्स तयार आहेत चटणी किंवा केचप सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर