मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुट रबडी

Photo of Fruit Rabari by Pranali Deshmukh at BetterButter
726
6
0.0(0)
0

फ्रुट रबडी

Mar-23-2018
Pranali Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रुट रबडी कृती बद्दल

फ्रुट आणि दूध यांचं कॉम्बिनेशन करायचं म्हटलं तर आपण कस्टर्ड निवडतो .पण कस्टर्ड पेक्षा स्वादिष्ट बनवायचं असेल तर फ्रुट रबडी बनवा ....अगदी गोड न खणाराही आवडीने संपवेल अशी हि डेझर्ट रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • सिमरिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. फुल क्रीम दूध 1 लिटर
  2. 1/4 कप साखर
  3. 1/4 कप डाळिंबाचे दाणे
  4. 1/4 कप सफरचंद तुकडे
  5. 1/4 कप काळे अंगूर
  6. 1/4 कप हिरवे अंगूर
  7. 1/4 कप ऑरेंज स्लाइस
  8. 1/4 कप केळी
  9. वेलची पावडर 1 tbsp

सूचना

  1. दूध पातेल्यात उकळायला ठेवा .जर लोखंडाची कढई असेल तर फारच छान .
  2. उकळी आल्यावर चचमच्याने सारखे ढवळत राहा .हळूहळू दूध आटू लागेल आणि साय धरायला लागेल ती चमच्याने दुधात मिक्स करायची .
  3. दूध 1/2 झालं कि त्यात साखर घालायची आणि परत तसेच ढवळत 1/4 होऊ द्यायचे .
  4. वेलची पावडर घालून गॅस बंद करायचा.आणि दूध थंड होऊ द्यायचं.
  5. तोपर्यंत फळं तयार ठेवायची .
  6. दूध रूम टेम्परेचरवर थंड झाले कि फ्रिजमध्ये 1/2 ते 1 तास ठेवायचं.
  7. थंड रबडीत फळं मिक्स करून
  8. थंड थंड सर्व्ह करायची

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर