व्हेज बिर्याणी | Veg Biryani Recipe in Marathi

प्रेषक Archana Lokhande  |  24th Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Veg Biryani recipe in Marathi,व्हेज बिर्याणी, Archana Lokhande
व्हेज बिर्याणीby Archana Lokhande
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

व्हेज बिर्याणी recipe

व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg Biryani Recipe in Marathi )

 • १/२ किलो बासमती किंवा आवडीप्रमाणे कोणताही तांदूळ
 • भाज्या :- फ्लाँवर ,फरसबी,गाजर, सिमला मिरची, वाटाणा,बटाटा प्रत्येकी १ वाटी
 • खडा मसाला:-लवंग, मीरी, दालचिनी, विलायची, तेजपत्ता प्रत्येकी ४-५
 • कांदे ७
 • टोमॅटो २
 • लसूण १५ पाकळ्या
 • आल २"
 • कोथिंबिर
 • लाल तिखट २ चमचे
 • बिर्याणी मसाला ४ चमचे
 • तेल आवश्यकेतनुसार
 • मीठ चवीप्रमाणे
 • पाणी
 • साखर १ चमचा
 • तळलेले काजू, बदाम

व्हेज बिर्याणी | How to make Veg Biryani Recipe in Marathi

 1. प्रथम सर्व भाज्या धूऊन कापून घेऊन ३/४ शिजवून घेतले.
 2. तांदूळ धुऊन १/२ तास भिजवून ३/४ शिजवून घेतले.
 3. नंतर ४ कांदे, २ टोमॅटो, लसूण, आल आणि थोडी कोथिंबीर घालून वाटण तयार करून घेतले.
 4. उरलेले ३ कांदे ऊभे कापून त्याला एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर घालून सर्व कांदा मोकळा होईल असे मिक्स करून घेतले.
 5. आता एका कढईत तेल घालून तापत ठेवा आणि दुसऱ्या भांड्यात चार चमचे तेल घालून त्यात वाटलेले वाटण घाला आणि गँस कमी करून झाकन झाकून ५ मिनीट ठेवा.
 6. तेल तापल्यावर त्यात कांदा हाताने पिळून पाणी काढून टाका आणि छान गोल्डन ब्राऊन तळून बाजूला काढून ठेवा.
 7. आता मसाल्याला छान तेल सुटले असेल. मग वाफवलेल्या भाज्या, लाल तिखट, बिर्याणी मसाला आणि मीठ घालून मिक्स करून भाजी पाच मिनीट वाफवून घ्या.
 8. तोपर्यंत घरभर वास झाला असेलच. आता त्यात शिजवलेला भात, तळलेला कांदा आणि कोथिंबिर घालून हलक्या हाताने थोडा मिक्स करून ५ मिनीट झाकून गँस बंद करा.
 9. सव्हिंग डिशमध्ये तयार व्हेज बिर्याणी घेऊन त्यावर तळलेले काजू, बदाम आणि कोथिंबीरीने डिश सजवून सर्व्ह करा.

My Tip:

आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या कमी जास्त प्रमाणात चालतात.

Reviews for Veg Biryani Recipe in Marathi (0)