मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज बिर्याणी

Photo of Veg Biryani by Archana Lokhande at BetterButter
2138
8
0.0(0)
1

व्हेज बिर्याणी

Mar-24-2018
Archana Lokhande
20 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज बिर्याणी कृती बद्दल

व्हेज बिर्याणी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. १/२ किलो बासमती किंवा आवडीप्रमाणे कोणताही तांदूळ
  2. भाज्या :- फ्लाँवर ,फरसबी,गाजर, सिमला मिरची, वाटाणा,बटाटा प्रत्येकी १ वाटी
  3. खडा मसाला:-लवंग, मीरी, दालचिनी, विलायची, तेजपत्ता प्रत्येकी ४-५
  4. कांदे ७
  5. टोमॅटो २
  6. लसूण १५ पाकळ्या
  7. आल २"
  8. कोथिंबिर
  9. लाल तिखट २ चमचे
  10. बिर्याणी मसाला ४ चमचे
  11. तेल आवश्यकेतनुसार
  12. मीठ चवीप्रमाणे
  13. पाणी
  14. साखर १ चमचा
  15. तळलेले काजू, बदाम

सूचना

  1. प्रथम सर्व भाज्या धूऊन कापून घेऊन ३/४ शिजवून घेतले.
  2. तांदूळ धुऊन १/२ तास भिजवून ३/४ शिजवून घेतले.
  3. नंतर ४ कांदे, २ टोमॅटो, लसूण, आल आणि थोडी कोथिंबीर घालून वाटण तयार करून घेतले.
  4. उरलेले ३ कांदे ऊभे कापून त्याला एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर घालून सर्व कांदा मोकळा होईल असे मिक्स करून घेतले.
  5. आता एका कढईत तेल घालून तापत ठेवा आणि दुसऱ्या भांड्यात चार चमचे तेल घालून त्यात वाटलेले वाटण घाला आणि गँस कमी करून झाकन झाकून ५ मिनीट ठेवा.
  6. तेल तापल्यावर त्यात कांदा हाताने पिळून पाणी काढून टाका आणि छान गोल्डन ब्राऊन तळून बाजूला काढून ठेवा.
  7. आता मसाल्याला छान तेल सुटले असेल. मग वाफवलेल्या भाज्या, लाल तिखट, बिर्याणी मसाला आणि मीठ घालून मिक्स करून भाजी पाच मिनीट वाफवून घ्या.
  8. तोपर्यंत घरभर वास झाला असेलच. आता त्यात शिजवलेला भात, तळलेला कांदा आणि कोथिंबिर घालून हलक्या हाताने थोडा मिक्स करून ५ मिनीट झाकून गँस बंद करा.
  9. सव्हिंग डिशमध्ये तयार व्हेज बिर्याणी घेऊन त्यावर तळलेले काजू, बदाम आणि कोथिंबीरीने डिश सजवून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर