मुख्यपृष्ठ / पाककृती / शाही पनीर ईन व्हाईट ग्रेवी

Photo of Shahi paneer in white gravy by Ajinkya Shende at BetterButter
0
7
0(0)
0

शाही पनीर ईन व्हाईट ग्रेवी

Mar-24-2018
Ajinkya Shende
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाही पनीर ईन व्हाईट ग्रेवी कृती बद्दल

कांदा आणि काजू च्या ग्रेवी मधे बनवलेली शाही आणि चवदार अशी पनीर ची खास पार्टी रेसीपी.

रेसपी टैग

 • मध्यम
 • डिनर पार्टी
 • नॉर्थ इंडियन
 • मेन डिश

साहित्य सर्विंग: 3

 1. ४ मध्यम आकाराचे कांदे
 2. १०-१२ काजू
 3. १ चमचा मगज बी
 4. खडा मसाला(२-३ लवंगा,४-५ काळी मीरी,दालचीनी १ इंच,२-३ हिरवी वेलची,तेजपत्ता २)
 5. ४-५ पाकळ्या लसुण
 6. २ कमी तिखट हिरव्या मिरच्या(मिर्चीला मधोमध चिर द्यावी)
 7. छोटा तुकडा आलं
 8. मीठ चवीनुसार
 9. २ चमचे किसलेला खवा
 10. १२५ ग्रॅम पनीर
 11. बटर २ चमचे
 12. तेल २-३ चमचे
 13. १ चमचा साखर
 14. २ चमचे फ्रेश क्रीम
 15. कोथिम्बीर

सूचना

 1. प्रथम ४ कांदे,काजू व मगज बी पाण्यात उकळवुन शिजवुन घ्यावे व थंड झाल्यावर मिक्सर मधे ह्याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यावी.
 2. नंतर एका पॅन २-३ चमचे तेल घेवून तेल तापल्यावर त्यात तेजपत्ता सोडून सर्व खडा मसाला थोडासा ठेचुन तेलात १ मिनिट परतवुन घ्यावा व हे तेल गाळुन घ्यावे.
 3. नंतर त्याचं पॅन मधे मसाले परतवलेलं तेल व १ चमचा बटर टाकून तेल व बटर व्यवस्थित तापल्यावर त्यात चिर दिलेल्या हिरव्या मिरच्या व तेजपत्ता टाकून काजू आणि कांद्याची पेस्ट व्यवस्थित परतवुन घ्यावी.
 4. नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी,चवीनुसार मीठ,साखर,खवा टाकून भाजी व्यवस्थित मेळ धरेपर्यंत शिजवुन घ्यावी.
 5. नंतर त्यात पनीर,फ्रेश क्रीम,१ चमचा बटर व कोथिम्बीर टाकून भाजी २-३ मिनिट पुन्हा शिजवुन घ्यावी.
 6. तयार भाजी सर्विंग प्लेट/बाऊल मधे काढून वरुन कोथिम्बीर टाकून गार्निश करुन घ्यावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर