मुख्यपृष्ठ / पाककृती / हक्का नूडल्स

Photo of Hakka noodles by Aarti Nijapkar at BetterButter
1360
4
0.0(0)
0

हक्का नूडल्स

Mar-24-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हक्का नूडल्स कृती बद्दल

सर्वाना माहीत असणारी आणि आवडणारी अशी ही पाककृती हक्का नूडल्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • चायनीज
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. नूडल्स १ पॅकेट
  2. तेल २ मोठे चमचे
  3. पाणी नूडल्स उकळण्यासाठी
  4. आलं बारीक चिरलेली १ लहान चमचा
  5. लसूण बारीक चिरलेली १ लहान चमचा
  6. गाजर बारीक पातळ चिरलेले १/३ वाटी
  7. शिमला मिरची बारीक पातळ चिरलेले १/३ वाटी
  8. कोबी बारीक पातळ चिरलेले १/३ वाटी
  9. कांद्याची पात ३ मोठे चमचे
  10. हिरवी मिरची सॉस १ लहान चमचा
  11. सोया सॉस १ लहान चमचा
  12. व्हिनेगर १/२ लहान चमचा
  13. टोबॅस्को सॉस १/२ लहान चमचा
  14. साखर चिमूटभर
  15. मीठ गरजेनुसार

सूचना

  1. पाण्यात मीठ व तेल घालून उकळून घ्या मग नूडल्स घालून उकळवून घ्या अर्धे कच्चे मग थंड पाण्याखाली धरा किचन ओटा किंवा परातीला तेल लावून घ्या मग नूडल्स सुट्टे करून घाला
  2. आता गॅस वर कढई ठेवा त्यात थोडं तेल घाला बारीक चिरलेल्या आलं लसूण घालून परतवून घ्या
  3. मग गाजर , शिमला मिरची घालून एकत्र करा
  4. आता चिली सॉस , सोया सॉस, टोबॅस्को सॉस ,व्हिनेगर ,साखर घालून एकजीव करा
  5. आता नूडल्स घाला व कोबी व कांद्याची पात घालून नूडल्स टॉस करून घ्या गरज वाटत असेल तर मीठ घाला
  6. आता गरमागरम हक्का नूडल्स तयार आहेत खाण्यासाठी मस्त सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर