मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला खेकडे

Photo of CRAB Masala by Sujata Loke at BetterButter
518
3
0.0(0)
0

मसाला खेकडे

Mar-24-2018
Sujata Loke
45 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला खेकडे कृती बद्दल

खेकडे बऱ्याच प्रकाराचे असतात, समुद्रातले,खाडीचे, डोंगरातले, गोड्या पाण्यातले असतात. आज आपण खाडीतले खेकडे करणार आहोत.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • डिनर पार्टी
  • गोवा
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. ६ मोठे खेकडे
  2. तीन मोठे कांदे
  3. 1टे. स्पून आले,लसूण पेस्ट
  4. टोमॅटो 2 छोटे
  5. ओले खोबरे 4 मोठेचमचे
  6. सुखे खोबरे 4 मोठे चमचे
  7. 3 टी. स्पून चमचे गरम मसाला( मालवणी मसाला)
  8. पाव टी. स्पून हळद
  9. 1 मोठा चमचा खसखस
  10. 2 टे. स्पून तेल
  11. कोकम 2 ते 3
  12. चवीनुसार मीठ

सूचना

  1. प्रथम खेकडे साफ करून घ्या
  2. खेकड्याचे डेंगे, पाय वेगवेगळे करा, पोटाच्या कवचासारखा टणक भाग बाजूला करून आतील भाग स्वच्छ धुवून घ्यावा व दोन तुकडे करावेत. बाकीच्या पायाचे तुकडे मिक्सरला बारीक वाटुन गाळून रस्सा बाजूला ठेवावा.
  3. कढईत 1 टे. स्पून तेल घालुन 1 मोठा कांदा उभा चिरून तेलात घालावे त्यात खसखस घालावा नंतर ओले खोबरे, व सुखे खोबरे घालुन खरपूस भाजून घ्यावे... थंड झाल्यावर मिक्सरला बारीक वाटून घ्यावे
  4. एका पातेल्यात 1 टे. स्पून तेल गरम करून त्यात दोन कांदे बारीक करून घालावे, कांदा परतल्यावर त्यात टोमॅटो बारीक चिरून घाला,नंतर आले, लसूण पेस्ट ,गरम मसाला(मालवणी मसाला) घाला... जर गरम मसाल्यात लाल मिरची नसेल तर 1 टी स्पून लाल तिखट, हळद घालुन मसाला परतुन घ्यावा ,त्यानंतर खेकड्याच्या पायाचा रस्सा,खेकड्याचे तुकडे घालून 10 मिनिटे शिजू द्यावे त्यात चवीनुसार मीठ, खोबऱ्याचे वाटण,कोकम घालून परत 10 मिनिटे शिजू द्यावे
  5. चपाती किव्हा तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर