मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड मेदू वडा

Photo of Bread medu vada by Pranali Deshmukh at BetterButter
620
6
0.0(0)
0

ब्रेड मेदू वडा

Mar-25-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड मेदू वडा कृती बद्दल

झटपट एखादा मस्त पदार्थ जर पार्टीसाठी करायचा असेल तर काय करावा हा प्रश्न पडतो .कारण एखादा प्रोग्रॅम म्हटला कि सामानाची यादी आणि जमवाजमव करावी लागते पण जर का एखादी पार्टी अचानक अरेंज झाली तर नेमकं काय करावं हे कळत नाही .अशीच एक रेसिपी पार्टीसाठी झटपट होणारा ब्रेड मेदू वडा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ब्रेडचा चुरा 2 कप
  2. तांदुळाचे पीठ 1/4 कप
  3. राव 1/2 कप
  4. कांदा एक बारीक चिरून
  5. हिरव्या मिरच्या 3-4 चिरून
  6. कोथिंबीर 1/4 कप चिरून
  7. मीठ
  8. योर्गट 1/4 कप
  9. तेल 1 कप
  10. जिरं 2 tbsp

सूचना

  1. सर्व्ह साहित्य जमवून घ्या.
  2. एका बाऊलमध्ये सर्व साहित्य मिक्स करा .
  3. त्यामध्ये योर्गट घालून छान मळून घ्या.
  4. छोटे छोटे गोळे करून टिक्कीसारखा आकार द्या .हातानीप्रेस करून चापट बनवा आणि बोटानी मध्यभागी छिद्र करा.
  5. कढईत तेल घाला तेल तापले कि कमी मध्यम फ्लेमवर तळून घ्या.
  6. छान चटणीबरोबर सर्व्ह करा.
  7. तळताना हलक्या ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळायचे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर