Photo of Parda Biryani by Nayana Palav at BetterButter
1159
12
0.0(8)
0

Parda Biryani

Mar-25-2018
Nayana Palav
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Parda Biryani कृती बद्दल

नेहमी नेहमी तेच तेच पुलाव, बिर्याणी खाउन कंटाळा येतो.आपल्याला सतत नवीन काही तरी खावेशे वाटते. म्हणून मी ही परदा बिर्याणी बनवली आहे. खूप चविष्ट होते ही बिर्याणी, तुम्ही पण बनवा. कशी झाली ते नक्की सांगा, चला तर पाहु या बिर्याणीची पाककृती.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • कठीण
  • डिनर पार्टी
  • मुघलाई
  • सिमरिंग
  • बेकिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बासमती तांदूळ २ कप
  2. चिकन ५०० ग्राम
  3. लिंबूरस १ लिंबाचा
  4. साजूक तूप ५ टेबलस्पून
  5. दालचिनी २ इंच तुकडा
  6. तेजपत्ता २-३
  7. लवंग ७-८
  8. जिरे १ टीस्पून
  9. हिरवी वेलची ४
  10. मोठी वेलची २
  11. बदियान २-३
  12. हिरवी मिरची २-३
  13. कांदे उभा चिरलेला ४
  14. हळद १/२ टीस्पून
  15. मीठ चवीनुसार
  16. टोमॆटो २ बारीक चिरून
  17. आल लसूण पेस्ट २ टेबलस्पून
  18. लाल मिरची पावडर २ टेबलस्पून
  19. दही १ कप
  20. गरम मसाला १ टीस्पून
  21. गुलाब पाणी काही थेंब
  22. पालक पेस्ट, हळदिचे पाणी, केशराचे पाणी रंगासाठी
  23. पुदीना पाने मुठभर
  24. कोथिंबीर पाने मुठभर
  25. मगज बी १/२ कप
  26. काजू १४ - २० तुपावर भाजलेले
  27. बिर्याणी मसाला १ टेबलस्पून ( कोणत्याही ब्रँडचा)
  28. पाणी आवश्यकतानुसार (५ कप भातासाठी)
  29. ओव्हन बिरयाणीला दम देण्यासाठी
  30. मैदा १ कप (पडदा बनवण्यासाठी)
  31. पाणी पिठ मळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम तांदूळ धूवून बाजुला ठेवा.
  2. १५-२० मिनिट भिजू दया.
  3. तोपर्यंत चिकन धूवून घ्या.
  4. कोंथिबीर, पुदीना, मगज बी, पाणी घालून मिक्सरला पेस्ट करा.
  5. गॅसवर एक भांडे गरम करत ठेवा.
  6. १ चमचा तूप घाला.
  7. त्यावर काजू घालून परता.
  8. बाजूला ठेवा.
  9. आता मिरी, तेजपत्त, लवंग, बदियान,दालचिनी, वेलची परता.
  10. धुतलेला तांदूळ घाला.
  11. एका भांडयात ५ कप पाणी उकळून भातात घाला.
  12. मीठ घाला, लिंबूरस घाला.
  13. भात जरा शिजला, भाताची शितं नरम झाले की, भात चाळणीत ओता.
  14. या भाताचे तीन भाग करा.
  15. आता गॅसवर एक भांडे गरम करत ठेवा.
  16. तूप घाला, कांदा ब्राउन होइपर्यंत परता.
  17. कांदा बाजूला काढून ठेवा.
  18. तूप घाला उरलेला खडा मसाला घाला, हिरवी मिरची, लाल मिरची, परता.
  19. हळद घाला, टोमॅटो घाला.
  20. लाल मिरची पावडर, बिर्याणी मसाला, गरम मसाला, घाला,
  21. दही घाला.
  22. मगज पेस्ट घाला.
  23. झाकण ठेवून शिजू द्या.
  24. चिकन घाला, लिंबूरस घाला.
  25. चिकन शिजू द्या.
  26. आता मैदा मळून घ्या.
  27. आता एका हंडीत खाली चिकनचा थर द्या.
  28. नंतर भाताचा थर दया.
  29. परत चिकनचा थर द्या.
  30. नंतर भाताचा थर दया.
  31. आता काजू घाला, गुलाबाचे पाणी घाला.
  32. आता ब्राउन कांदा घाला.
  33. पालक पेस्ट, हळद पाणी, केशर पाणी भातात खळगे करुन ओता.
  34. आता हंडीवर मैदयाची चपाती पाणी लावून चिकटवून घ्या.
  35. ओव्हन चालू करा.
  36. २५० डिग्रीला ५ - ८ मिनीटे बिर्याणी बेक करा.
  37. तयार आहे तुमची चविष्ट परदा बिर्याणी.

रिव्यूज (8)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ujwala Nirmale
Mar-26-2018
Ujwala Nirmale   Mar-26-2018

Excellent

Avinash Ashirgade
Mar-25-2018
Avinash Ashirgade   Mar-25-2018

झक्कास......

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर