मुख्यपृष्ठ / पाककृती / वेज नवाबी कबाब

Photo of Veg. Nawabi Kabab by Ajinkya Shende at BetterButter
1296
4
0.0(0)
0

वेज नवाबी कबाब

Mar-25-2018
Ajinkya Shende
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज नवाबी कबाब कृती बद्दल

बटाटा-सुकामेवा-पनीर-चीज चा वापर करुन केलेले कबाब,पार्टी मधील स्टार्टर साठी बेस्ट मेनू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • अकंपनीमेंट

साहित्य सर्विंग: 5

  1. ५ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  2. १ बारीक कापलेला कांदा
  3. ५०-७५ ग्रॅम किसलेलं पनीर
  4. २ क्यूब चीज किसुन
  5. ५-६ काजूचे बारीक तुकडे
  6. ४-५ बदामाचे बारीक तुकडे
  7. पाव वाटी किसमिस
  8. अर्धी वाटी वाफवलेले ताजे हीरवे वाटाणे
  9. पाव वाटी किसलेलं गाजर
  10. १ चमचा आलं-हिरवी मिर्ची ठेचा
  11. १ चमचा लाल मिर्ची पावडर
  12. पाव चमचा हळद
  13. अर्धा चमचा धणा जीरा पावडर
  14. गरम मसाला अर्धा चमचा
  15. मीठ चवीनुसार
  16. चाट मसाला अर्धा चमचा
  17. बारीक कापलेली कोथिम्बीर
  18. मैदा पाऊण वाटी
  19. ब्रेड क्रम्ब्स १ वाटी
  20. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. प्रथम उकडलेला बटाटा कुस्करुन त्यात वाफवलेले वाटाणे,किसलेलं गाजर,कांदा,पनीर,चीज,काजू-बदाम-किसमिस,आलं-हिरवी मिर्ची ठेचा,सर्व मसाले,मीठ,ब्रेड क्रम्ब्स,कोथिम्बीर व २-३ चमचे मैदा टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्यावं.
  2. नंतर एका कढई मधे तळण्यासाठी तेल तापत ठेवावे.
  3. नंतर तयार बटाट्याच्या मिश्रणाचे लांबट आकाराचे एकसारखे कबाब बनवून ठेवावे.
  4. तेल व्यवस्थित तापल्यावर त्यात कबाब मैद्यामधे घोळवून मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित तळुन घ्यावे.
  5. तयार कबाब वरून किसलेले बदाम,किसलेलं पनीर व कोथिम्बीर टाकून गार्निश करावे व पुदीना चटणी किंवा टोमॅटो केचप सोबत सर्व करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर