मुख्यपृष्ठ / पाककृती / ईटालिअन स्टाईल पोटॅटो चीज बॉल्स विथ पिझ्झा सॉस अँड चीज डीप

Photo of Italian style potato cheese balls with pizza sauce and cheese dip by Ajinkya Shende at BetterButter
0
3
0(0)
0

ईटालिअन स्टाईल पोटॅटो चीज बॉल्स विथ पिझ्झा सॉस अँड चीज डीप

Mar-25-2018
Ajinkya Shende
25 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ईटालिअन स्टाईल पोटॅटो चीज बॉल्स विथ पिझ्झा सॉस अँड चीज डीप कृती बद्दल

लहान मुलांच्या बर्थ-डे पार्टीसाठी बेस्ट रेसीपी.

रेसपी टैग

 • मध्यम
 • किड्स बर्थडे
 • इटालियन

साहित्य सर्विंग: 5

 1. पोटॅटो चीज बॉल्स साठी-
 2. ४ मध्यम आकाराचे उकडुन मॅश केलेले बटाटे
 3. १ वाटी ब्रेड क्रंब्स
 4. अर्धा चमचा मिक्स हर्ब्स
 5. अर्धा चमचा चिली फ्लेक्स
 6. पाव चमचा काळी मीरी पावडर
 7. मीठ
 8. २-३ क्यूब चीज किसुन
 9. अर्धी वाटी मैदा
 10. तळण्यासाठी तेल
 11. पिझ्झा सॉस साठी-
 12. ३ मध्यम आकाराचे टोमॅटोची प्यूरी(टोमॅटो वाफवुन साल काढून मिक्सर मधे प्यूरी करावी)
 13. २ चमचे बटर/ऑलिव ऑईल/कुठलाही खाण्याचं तेल
 14. ५-६ पाकळ्या ठेचलेला लसुण
 15. अर्धा चमचा काळी मीरीची भरड
 16. १ चमचा चिली फ्लेक्स
 17. अर्धा चमचा मिक्स हर्ब्स
 18. बेसील किंवा घरातील तुळशीची ५-६ पानं
 19. साखर २ चमचे
 20. २ चमचे टोमॅटो केचप
 21. मीठ चवीनुसार
 22. चीज डीप साठी-
 23. ३ क्यूब किसलेलं चीज
 24. अर्धी वाटी दूध
 25. २ चमचे बटर
 26. चिली फ्लेक्स
 27. मिक्स हर्ब्स
 28. चिमुठभर काळी मीरी पावडर
 29. चिमुठभर मीठ

सूचना

 1. पिझ्झा सॉस-प्रथम एका पॅन/सॉस पॅन मधे बटर/ऑलिव ऑईल किंवा कुठलही खाण्याचं तेल टाकून तेल तापल्यावर त्यात ठेचलेला लसुण टाकून व्यवस्थित परतवुन घ्या.
 2. नंतर त्यात टोमॅटो प्यूरी टाकून टोमॅटो प्यूरी सुद्धा व्यवस्थित पारतवुन घ्यावी.
 3. गॅस फ्लेम बंद करुन त्यात २ चमचे टोमॅटो केचप टाकून सॉस व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
 4. चीज डीप-प्रथम एका पॅन मधे एक ते दिड ग्लास पाणी गरम करत ठेवा.
 5. पाणी गरम होईपर्यंत एका बाऊल मधे किसलेलं चीज,दूध आणि बटर टाकून तो बाऊल गरम पाण्याच्या पॅन मधे ठेवून चीज,दूध आणि बटर व्यवस्थित मेळ धरेपर्यंत गरम करुन घ्या(बीटर च्या सहय्याने सतत ढवळत रहावे) व थोडी स्टीकी कंसीस्टंसी झाली की फ्लेम बंद करुन त्यात चिली फ्लेक्स,मीरी पावडर,मिक्स हर्ब्स,मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
 6. पोटॅटो चीज बॉल्स- प्रथम एका बाऊल मधे मॅश केलेले बटाटे,ब्रेड क्रंब्स,चीली फ्लेक्स,मिक्स हर्ब्स,काळी मीरी पावडर व मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
 7. नंतर एका कढईमधे तळण्यासाठी तेल तापत ठेवा.
 8. तेल तापेपर्यंत बटाट्याच्या मिश्रणाची पारी करुन त्यात आवडीनुसार चीज स्टफ करुन त्याचे गोळे/बॉल्स बनवून घ्या.
 9. तेल व्यवस्थित तापल्यावर तयार बॉल्स मैद्यात घोळवुन हलकासा लालसर रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तळुन घ्या.
 10. तयार चीज पोटॅटो बॉल्स पिझ्झा सॉस व चीज डीप सोबत सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर