मुख्यपृष्ठ / पाककृती / वेज डिमसम / मोमोज

Photo of Veg dimsum / Momos by Aarti Nijapkar at BetterButter
763
7
0.0(0)
0

वेज डिमसम / मोमोज

Mar-25-2018
Aarti Nijapkar
40 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज डिमसम / मोमोज कृती बद्दल

सर्व भाज्यांचं मिश्रण करून वेज डिमसम/ मोमोज बनवणार आहोत सर्वांच्या परिचयाच असलेलली पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • चायनीज
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. वेज भरणासाठी
  2. कोबी बारीक चिरलेली १/२ वाटी
  3. गाजर बारीक चिरलेली १/२ वाटी
  4. शिमला मिरची बारीक चिरलेली १/३ वाटी
  5. परसबी बारीक चिरलेली १/३ वाटी
  6. कांदा बारीक चिरलेली १/३ वाटी
  7. कांद्याची पात १/३ वाटी
  8. तेल १ चमचा
  9. आलं बारीक चिरलेली २ मोठे चमचे
  10. लसूण बारीक चिरलेली २ मोठे चमचे
  11. काळीमिरी कुटलेली १ लहान चमचा
  12. सोया सॉस १ मीठ चमचा
  13. मीठ चवीनुसार
  14. आवरणासाठी
  15. मैदा १ वाटी
  16. मीठ १/२ लहान चमचा
  17. पाणी १/४ वाटी किंवा गरजेनुसार

सूचना

  1. सर्व प्रथम मैदा मीठ एकत्र करून थोड थोडं पाणी घालून मळून घ्या व ओला सुती कापड झाकून ठेवून द्या
  2. आता सर्व भाज्या बारीक चिरलेलया आहेत , एक कढई घ्या त्यात तेल घालून आलं लसूण चांगल परतवून घ्या
  3. आता एक एक करून सर्व भाज्या घाला सोया सॉस व चवीनुसार मीठ घालून टॉस करून घ्या काळीमिरी पावडर घालुन भाज्यांचं मिश्रण एकजीव करून घ्या व थोडे अर्धे कच्चे ठेवा
  4. एका ताटात काडून गार करत ठेवा
  5. मैद्याचं कणिक घ्या त्याचे लहान गोलाकार चकत्या लाटून घ्या फार जाड ठेवू नये
  6. तयार भाज्यांचं मिश्रण आत भरून हवा तो आकार देऊन मोमोज तयार करा सर्व अश्या पद्धतीने तयार करून घ्या
  7. आता मोमोज तर स्टीमर असेल तर उत्तम नसेल तर स्टील चाळणीत केळीच पान ठेवून तेल लावून घ्या व मोमोज त्यावर ठेवून वाफवून घ्या
  8. सर्व मोमोज वाफवून घ्या
  9. तयार झाल्यावर गरमागरम वेज मोमोज सर्व्ह करा शेजवान सोस सोबत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर