कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर अकबरी

Photo of Paneer Akabari by Shilpa Deshmukh at BetterButter
0
5
0(0)
0

पनीर अकबरी

Mar-25-2018
Shilpa Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर अकबरी कृती बद्दल

कोणत्याही पार्टीसाठी भाजी सर्वात महत्वाची असते .पनीर अकबरी हि भाजी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • कठीण
 • किड्स बर्थडे
 • महाराष्ट्र
 • ब्लेंडींग
 • सौटेइंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. पनीर 200 gr.
 2. कांदा 1
 3. टमाटर 1
 4. काजू 5-6
 5. बदाम 4
 6. मगज बी 12-13
 7. दालचिनी 1
 8. तेजपान 1
 9. मिरे 4
 10. वेलची मोठी 1
 11. पुदिना आणि हिरवी मिरची चटणी 4 tbsp
 12. चीज किसून 1/4 कप
 13. टोमॅटो सॉस 1 tbsp
 14. तिखट 2 tbsp
 15. मीठ
 16. हळद 1 tbsp

सूचना

 1. कांदा आणि टोमॅटो उकळून वेगवेगळी प्युरी मिक्सर मधून काढा.
 2. काजू ,मगज ,बदाम यांना 2 तास भिजत घाला आणि मिक्सरमधून वाटून घ्या.
 3. पनीरचे चौकोनी पातळ तुकडे करा .
 4. चीज ,टोमॅटो सॉस ,तिखट मीठ मिक्स करा.
 5. पनीरच्या स्लाइसवर पुदिना चटणी स्प्रेड करा आणि मिक्स केलेले चीज स्टफिंग सारखे ठेवा .
 6. दुसरा पनीरचा तुकडा वरून ठेवून सॅण्डवीज सारखं बनवा.
 7. आता पॅनमध्ये थोडं तेल टाकून हे सॅण्डवीज दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करा.
 8. आणि बाजूला ठेवा .पॅन मध्ये तेल टाका तेजपान ,दालचिनी ,मिरे ,वेलची घालून परतवा.
 9. कांदा प्युरी ऍड करा थोडं परतवल कि ,काजू पेस्ट परतवा
 10. नंतर टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतावा
 11. फ्रेश क्रीम घाला एकजीव होईपर्यंत मिक्स करत राहा.
 12. तिखट हळद मीठ घाला .पाच मिनिटांनी एक कप पाणी घालून झाकण ठेवून शिजू द्या.
 13. सर्व्ह करतांना पनीर ऍड करा आणि पनीर अकबरी सर्व्ह करा.
 14. चीज ,पुदिना च्या स्टफिंगमुळे पनीर आणखी टेस्टी लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर