मुख्यपृष्ठ / पाककृती / गोड शंकरपाळे

Photo of Sweet / God Shankarpali by Neeta Mohite at BetterButter
3836
4
0.0(0)
0

गोड शंकरपाळे

Mar-26-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड शंकरपाळे कृती बद्दल

गोड शंकरपाळे हे दिवाळीतबनवले जाणारे खास महाराष्ट्रीय पक्वान्न आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा ५०० ग्रॅम
  2. रवा.२५० ग्रॅम
  3. दूध अर्धा कप
  4. डालडा(वनस्पती)/तूप/तेल १ कप
  5. पिठी साखर ३०० ग्रॅम
  6. मीठ १ चिमुट
  7. तेल तळण्याकरता

सूचना

  1. थोडा डालडा आधी गरम करून घ्यावा . वाटल्यास मायक्रोवेव मध्ये ही गरम करता येईल.
  2. आता मैदा चाळून घ्या व त्यात रवा, पिठीसाखर आणि मीठ घालून त्यात गरम डालडा मिसळावा व हातानी चांगला कुस्करावा. सर्व मिश्रण रवाळ होईल.
  3. आता यात दूध मिसळावे व मऊ अशी कणिक भिजवावी.
  4. ही कानी चांगली १५ ते २० मिनिटे तिंबावी . यावर चांगलीच मेहनत अपेक्षित आहे.
  5. ही कणिक दमात कापडाने झाकून १५ ते २० मिनिटे ठेवावी.
  6. आता या कणकेचे मोठे गोळे करून त्याच्या मोठ्या पण जाडसर पोळ्या लाटाव्या .लाटताना सुका मैदा भूरभूरावा म्हणजे कणिक पोळपाटाला चिकटणार नाही.
  7. या पोळ्यांचे सुरी अथवा शंकरपाळे कातर च्या सहाय्याने लांबट चौकोनी तुकडे कातरावे.
  8. कढईत तेल तापवावे. तेल तापल्यावर मंद आंचेवर हे शंकरपाळे सोनेरी रंगावर तळून घ्यावे. अशा तर्हेने सर्व शंकरपाळे तळून घ्यावे.
  9. गार झाले कि हवाबंद डब्यात भरून ठेवावे. हे १० दिवस छान टिकतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर