Photo of Dal Dhokli by Disha Khurana at BetterButter
5084
439
4.7(0)
0

डाळ ढोकळी

Apr-03-2016
Disha Khurana
120 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • गुजरात
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. ढोकळीसाठी:
  2. गव्हाचे पीठ - अर्धी वाटी
  3. हळद - 1/4 लहान चमचा
  4. हिंग - 1 मोठी चिमुट
  5. मीठ चवीनुसार
  6. डाळीसाठी :
  7. तूरडाळ - 1 वाटी
  8. टोमॅटो - 2 (बारीक चिरलेले)
  9. हिरव्या मिरच्या - 2-3
  10. सुकलेल्या काश्मिरी लाल मिरच्या - 2-3
  11. चिंच (सुकलेली) - 2 मोठे चमचे
  12. गूळ - 1 मोठा चमचा
  13. मोहरी - अर्धा लहान चमचा
  14. जिरे - अर्धा लहान चमचा
  15. हळद - 1 लहान चमचा
  16. कडीपत्त्याची पाने - 7-8
  17. काश्मिरी लाल तिखट - 1 लहान चमचा
  18. तेल - 2 मोठे चमचे
  19. मीठ चवीनुसार
  20. एक मुठभर शेंगदाणे
  21. कोथिंबीर (बारीक चिरलेली) - 2-3 मोठे चमचे

सूचना

  1. ढोकळी बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याला कमीत कमी पाणी वापरून कणिक तयार करा. याला 10 मिनिटे बाजूला ठेवा.
  2. चिंचेला 15 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा. नंतर हाताने त्याला चोळून त्याचा रस तयार करा. नंतर रस एका गाळणीने गाळून घ्या.
  3. डाळ बनविण्यासाठी तुरीच्या डाळीला 2 तास भिजवून ठेवा. दोन तासानंतर डाळीला गाळून घ्या.
  4. एक प्रेशर कुकरमध्ये डाळ, हिरवी मिरची, 1 चिरलेले टोमॅटो, मीठ, हळद आणि दीड कप पाणी घालून 4 शिट्या होऊ द्या.
  5. काही वेळानंतर कुकर थंड झाल्यानंतर डाळीला एकसारखे बारीक करण्यासाठी व्यवस्थित घोटून घ्या.
  6. डाळीला कुकरमध्ये पुन्हा मोठ्या आचेवर ठेवा. यात चिरलेले टोमॅटो, चिंचेचा कोळ, चिरलेला गूळ, शेंगदाणे, 2 कप पाणी, मीठ घाला. पुन्हा याला उकळू द्या. नंतर मंद आचेवर 2 मिनिटे शिजवा.
  7. त्यादरम्यान, ढोकाळीच्या कणिकेच्या पातळ पोळ्या लाटून त्यांना डायमंड आकारात कापा. या कापांना उकळत्या डाळीत घाला. नंतर मंद आचेवर 6-7 मिनिटे शिजू द्या.
  8. एका फोडणीच्या भांड्यात तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता, सुक्या काश्मिरी मिरच्या आणि काश्मिरी लाल तिखट घाला.
  9. ही फोडणी लगेच डाळीवर घाला. आणि त्वरित कुकर झाका, ज्यामुळे फोडणीचा सुगंध पूर्ण डाळीत पसरेल.
  10. कोथिंबीरीने सजवा आणि गरमगरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर