मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला डोसा

Photo of MASALA Dosa by Sujata Loke at BetterButter
968
4
0.0(0)
0

मसाला डोसा

Mar-28-2018
Sujata Loke
30 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला डोसा कृती बद्दल

दक्षिण भारतात जास्त प्रमाणात केला जातो....आता संपुर्ण भारतात आवडीने खातात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. बारीक रवा (शिरा,उपम्याचा रवा) 3 वाट्या
  2. उडीद डाळ 1 वाटी
  3. मेथीचे दाणे 1 टी स्पून
  4. उकडलेले बटाटे 5
  5. कांदे 2 उभे बारीक चिरलेले
  6. टोमॅटो 1 बारिक चिरलेला
  7. तेल 3 ते.स्पून
  8. तूप आवडीनुसार
  9. खोबरे 1 वाटी
  10. कोथिंबीर बारीक चिरलेली 1 वाटी
  11. हिरव्या मिरच्या 3
  12. भिजवलेली चणा डाळ 1 टे स्पून
  13. भिजवलेली उडीद डाळ 1/2 ते.स्पून
  14. हळद 1 टी स्पून
  15. लसूण 1 पाकळी
  16. डाळे 2 चमचे
  17. कडीपत्ता 2 तुरे
  18. साखर चवीनुसार
  19. मीठ चवीनुसार

सूचना

  1. डोसा करायच्या आदल्या दिवशी दुपारी उदीद डाळ आणि मेथी पाण्याने स्वच्छ धुवून डाळीच्या दुप्पट पाणी घालुन 4 ते 5 तास भिजत ठेवावी.रात्री उडीद डाळ आणि मेथी मिक्सरला थोडी रवाळ वाटून घ्या.त्यात 3 वाटी रवा स्वच्छ निवडलेला आणि चवीनुसार मीठ मिक्स करून इडलीच्या पिठाएवढे पातळ असावे.8ते 10 तास ऊबदार जागेवर आंबवायला ठेवणे
  2. दुसऱ्या दिवशी सकाळी डोश्याची भाजी करायची. त्यात तेलात मोहरी,जिरेची फोडणी करावी त्यात कडीपत्ता, भिजवलेली चणा डाळ,उडीद डाळ, दोन उभे चिरलेले कांदे, हळद परतुन घ्या कांदा मऊ झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो बारीक केलेले उकडलेल्या बटाट्याचे तुकडे ,कोथिंबीर, मीठ चवीनुसार घालून व्यवस्थित परतुन घेणे
  3. हिरव्या चटणीसाठी 1 वाटी खोबरे,1 हिरवी मिरची, लसूण,डाळे, कोथिंबीर,साखर, मिठ चवीनुसार मिक्सरला वाटून घेणे.दोन चमचे तेलात हिंग,मोहरी, कडीपत्याची फ़ोडणी घालून चटणीवर घालावी
  4. गरम बिडाच्या किव्हा नॉनस्टिक पॅनवर जरा तेल टाकून टिशू पेपरने पुसून त्यावर डोश्याचे 1 चमचा पिठ घेऊन गोल आकारात फिरवावे,थोडं तेलकिव्हा तूप टाकून कालथ्याने पसरावे. नंतर बटाट्याची भाजी घालावी.
  5. सर्व्ह करताना सोबत चटणी दयावी.... तयार मसाला डोसा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर