मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार सँडविच

Photo of MATAR Sandwich by Sujata Loke at BetterButter
962
2
0.0(0)
0

मटार सँडविच

Mar-28-2018
Sujata Loke
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार सँडविच कृती बद्दल

सँडविच हा प्रकार लहान मुलांना खूप आवडतो.त्यात कोवळे मटाराची भाजी करून त्यात स्टफ केली की मुलांना खूपच आवडते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. सोललेले मटार दाणे 1 किलो
  2. 1 इंचआले ,20लसूणपाकळ्या ,6 ते 7 मिरची एकत्र करून पेस्ट 4 चमचे
  3. हळद 1 टी स्पून
  4. साखर चवीनुसार
  5. मीठ चवीनुसार
  6. मोहरी 1 टी स्पून
  7. ब्रेड 1
  8. तेल 1 टे. स्पून
  9. साजूक तूप 1 वाटी

सूचना

  1. प्रथम मटार मिक्सरमध्ये थोडे क्रश करून घ्यावे
  2. आले, लसूण, मिरची ची पेस्ट करून घेणे
  3. एका कढईत 1 टे स्पून तेल टाकावे तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाकावी ,नंतर त्यात आले,लसुण, मिरचीची पेस्ट व हळद टाकुन 2ते3 मिनिटे ठेवून त्यात थोडे पाणी घालावे, पेस्ट करपू देऊ नये...त्यात शेवटी भरडलेले मटार,मीठ, साखर घालून ,मंद आचेवर 10 मिनिटे शिजू द्यावे
  4. टोस्टर मध्ये 2 स्लाईज ब्रेड घेऊन त्यात मटारची भाजी पसरून सँडविच तयार करणे .एक वेळी 4 सँडविच तयार होतात ... टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर