BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / एग इन हरियाली नेस्ट

Photo of Eggs in haryali nest by Swati Kolhe at BetterButter
460
6
0(0)
0

एग इन हरियाली नेस्ट

Apr-02-2018
Swati Kolhe
30 मिनिटे
तयारीची वेळ
75 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एग इन हरियाली नेस्ट कृती बद्दल

सहज सुचलेली एक रेसिपी आहे ही. हल्ली मुलांना चायनीज भेळ किंवा स्ट्रीट फूड, हॉटेल मधले आकर्षक सजावट केलेले खायला फार आवडते त्यामुळे ते घरचे खायला जरा त्रास च देतात. आमचे पिल्ले तर रोजच हॉटेल मध्ये चला म्हणतात. म्हणून बऱ्याच वेळा हे असे पदार्थ बनवून खाऊ घालायचे. ज्यात आपण काही ही लपवून आणि हसत खेळत गोष्टी सांगत अगदी आपल्या डोळ्यासमोर फस्त होते की नाही पहा. हो थोडा वेळ लागतो ही रेसिपी बनवायला. पण मुलं इतक्या स्वाधीन आणि सगळं खाताना बघून केलेली मेहनत फळताना दिसते.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

 1. एग बनवण्यासाठी:
 2. सोयाबीन २५० ग्राम
 3. बटाटा १ मध्यम
 4. मोड आलेले कडधान्य १/४ कप
 5. तेल १ १/२ tbsp
 6. हिंग १/४ tsp
 7. अद्रक-लसूण-मिरची पेस्ट १ tbsp
 8. कांदे २ मध्यम
 9. मीठ चवीनुसार
 10. गरम मसाला १ tsp
 11. चाट मसाला १/२ tsp
 12. जिरेपूड १/२ tsp
 13. कोथिंबीर २ tbsp
 14. हरियाली नेस्ट बनवण्यासाठी:
 15. पालक १ जुडी
 16. तेल तळण्यासाठी
 17. मीठ चवीनुसार
 18. लाल तिखट चवीनुसार
 19. चाट मसाला चवीनुसार
 20. सजावटीसाठी:
 21. गव्हाच्या तळलेल्या शेवया

सूचना

 1. एग बनवण्यासाठी:
 2. प्रथम सोयाबीन धुवून घेऊन पाण्यात १०-१५ मिनिट शिजवून घ्या.
 3. कुकर मध्ये बटाटा, मोड आलेले कडधान्य, आणि १ कप पाणी घालून २ शिट्या काढून घ्या.
 4. लोखंडी कढई मध्ये तेल तापवून त्यात हिंग, लसूण-मिरची पेस्ट परतून घ्या.
 5. नंतर त्यात कांदा व थोडे मीठ घालून गुलाबीसर परतून घेऊन सोयाबीन चुरा घालून एक वाफ घेऊन परतवा
 6. वाफ काढल्यावर त्यात शिजवलेला बटाटा व कडधान्य थोडे चेचून घाला.
 7. मग मीठ, गरम मसाला, चाट मसाला व जिरेपूड घालून आणखी १-२ मिनिट वाफ काढून घ्या.वरून कोथिंबीर मिक्स करा.
 8. एग सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेऊन द्या.
 9. आता सारणाचे छोटे छोटे एग च्या आकाराचे मिश्रण घेऊन त्याला एग चा आकार देऊन थोड्या तेलात शॅलो फ्राय करून घ्यावे.
 10. हरियाली नेस्ट बनवण्यासाठी:
 11. धुवून सुकवलेली पालकाची पान उभ्या लांब आकारात कापून घ्या.
 12. कढई मध्ये तळण्यासाठी तेल तापवून घ्या.
 13. तेलाला धूर सुटला की कापलेले पालक थोडे थोडे करून तळून घ्या.
 14. आता सर्व पालक तळून झाल्यावर त्यात वरून मीठ, लाल तिखट, व चाट मसाला घालून अलगद एकजीव करा.
 15. डिश सजवण्यासाठी:
 16. आधी बेस ला तळलेल्या गव्हाच्या शेवया पसरवून त्यावर तळलेल्या पालकाचा थर ठेवावा(नेस्ट/ घोसला तयार होईल या पद्धतीने)
 17. मग त्यावर शॅलो फ्राय केलेले एग ठेऊन वरून थोडा चाट मसाला भुरभुरून सर्व्ह करा.
 18. टीप:
 19. जर एग तेलात सुटत असतील तर कॉर्नफ्लोउर ची पेस्ट करून त्यात घोळवून फ्राय करा.
 20. एग डीप फ्राय केले तरी चालतील किंवा पॅनमध्ये तेल न घालता रोस्ट केले तरी चालतील.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर