मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉकलेट शंकरपाळे

Photo of CHOCOLATE Shankarpale by Minal Sardeshpande at BetterButter
799
6
0.0(0)
0

चॉकलेट शंकरपाळे

Apr-02-2018
Minal Sardeshpande
20 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकलेट शंकरपाळे कृती बद्दल

खास मुलांसाठी नेहमीच्या पाककृतीत थोडा बदल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक वाटी दूध
  2. एक वाटी साखर
  3. एक वाटी तूप
  4. तीन टेबलस्पून कोको पावडर
  5. मीठ पाव टीस्पून
  6. तळणीसाठी तेल
  7. साडेचार वाट्या मैदा

सूचना

  1. मैदा आणि कोको पावडर एकत्र करून चाळून घ्या.
  2. दूध आणि साखर एकत्र करून गरम करा, साखर विरघळू द्या.
  3. दूध गार करत ठेवा.
  4. एका कढईत तूप तापवा.
  5. चाळलेल्या मैद्यात मीठ घाला आणि तुपाचे मोहन घाला.
  6. नीट मिक्स करा.
  7. थोडं गार होऊ द्या.
  8. गार झालेले दूध साखर मिश्रण घेऊन मैदा घट्ट मळा.
  9. गरज लागली तर थोडा सुका मैदा घ्या.
  10. तासभर झाकून ठेवा.
  11. छोटे गोळे करून सर्व शंकर पाळे लाटून, कातून घ्या.
  12. असे
  13. आता सोडवून एका गोळ्याचे एका ठिकाणी असे गठ्ठे करा.
  14. कढईत तेल घ्या. अंदाजे पाच वाट्या लागेल.
  15. तापले की एकेक गठ्ठा तेलात सोडा.
  16. आत गेल्यावर ते आपोआप मोकळे होतात.
  17. मध्यम आचेवर तळा.
  18. कोको पावडर मुळे रंग बदललेला पटकन कळत नाही.
  19. लक्ष ठेवून तळा.
  20. गार झाले की चहा बरोबर सर्व्ह करा.
  21. तयार शंकरपाळे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर