मुख्यपृष्ठ / पाककृती / अननसाचा शिरा

Photo of Pipeapple Sheera by Sudha Kunkalienkar at BetterButter
850
3
0.0(0)
0

अननसाचा शिरा

Apr-05-2018
Sudha Kunkalienkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अननसाचा शिरा कृती बद्दल

गोड शिऱ्याचा जरा वेगळा प्रकार. अननस घातल्यामुळे जास्त स्वादिष्ट बनतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. जाडा रवा दीड कप
  2. साखर सवा कप
  3. अननसाचे तुकडे १ कप
  4. अननसाचा रस अर्धा कप
  5. वेलची पूड अर्धा चमचा
  6. केशर
  7. तूप पाऊण कप
  8. काजूचे तुकडे एक मोठा चमचा
  9. मीठ चिमूटभर

सूचना

  1. केशर गरम पाण्यात भिजत घाला 
  2. १ चमचा तूप घालून काजू तळून घ्या 
  3. २ मोठे चमचे तूप घालून रवा मंद आचेवर भाजून घ्या 
  4. ४ कप पाणी उकळून रव्यामध्ये घाला. चमच्याने ढवळून झाकण ठेवा. 
  5. ३-४ मिनिटांनी साखर, अननसाचे तुकडे आणि अननसाचा रस घाला. ढवळून झाकण ठेवून शिजवा. 
  6. ३-४ मिनिटांनी तूप, केशर, वेलची, काजू  आणि मीठ घालून ढवळा. 
  7. स्वादिष्ट अननसाचा शिरा तयार आहे.  गरमागरम सर्व्ह करा. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर