मुख्यपृष्ठ / पाककृती / गुलकंद करंजी

Photo of Gulkand karanji by Swati Kolhe at BetterButter
0
6
0(0)
0

गुलकंद करंजी

Apr-05-2018
Swati Kolhe
15 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलकंद करंजी कृती बद्दल

या रेसिपी बद्दल विशेष एवढेच की गुलकंद ची कारंजी आमची आजी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तिच्या कडे गेलो की डब्बा भर बनवून ठेवायची आमच्यासाठी. तिच्या रेसिपीमध्ये ती ओले खोबरे व गुळ वापरून बनवायची. मी वेळ वाचवण्यासाठी सुक्या खोबऱ्याचे सारण बनवून त्यात गुलकंद ऍड करते कारण सुखे सारण बनवून फ्रिज मध्ये ठेवले की आरामात २ महिन्यापर्यंत चालते. एवढाच काय तो फरक.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 8

 1. सारणासाठी:
 2. खोबरे खिस १ कप
 3. ड्राय फ्रुईट्स १/२ कप
 4. पिठी साखर १/४ कप
 5. खसखस २ tbsp
 6. वेलची पूड १ tsp( ऑप्शनल)
 7. गुलकंद
 8. पारीसाठी:
 9. मैदा १ कप
 10. रवा २ tsp
 11. पिठी साखर १ tsp
 12. तूप १ tbsp
 13. मीठ चवीनुसार
 14. पाणी पीठ मळण्यासाठी

सूचना

 1. पारी बनवण्यासाठी:
 2. परात मध्ये तूप, पिठीसाखर व मीठ घेऊन फेसाळ होईपर्यंत चांगले फेटून घ्या.
 3. मग त्यात रवा व मैदा घालून कोरडेच मिश्रण ५-८ मिनिट छान हातावर मळून घ्या.
 4. शेवटी थोडे थोडे पाणी घालून पुरीच्या पिठासारखी मळून घ्या.
 5. ओल्या सुती कापडाने झाकून ठेवा २०-२५ मिनिट
 6. सारण तयार करण्यासाठी:
 7. पॅनवर कमी आचेवर खसखस भाजून घ्या.
 8. नंतर खोबरे भाजून घ्या.
 9. आता मोठ्या भांड्यात किंवा परात मध्ये खसखस, खोबरे, पिठीसाखर व वेलची घालून सारण एकजीव करून घ्या.
 10. गुलकंद वेगळा ठेवा किंवा सारणात मिक्स केला तरी चालेल.
 11. करंजी बनवण्यासाठी:
 12. कढई मध्ये तेल तापत ठेवा.
 13. दुसरीकडे मळलेल्या पिठातून पुरीएवढा गोळा घेऊन पारी लाटून त्यावर सारण भरून पारी बंद करून कारंजी चा आकार द्या.
 14. मध्यम आचेवर करंजी खरपूस तळून घ्या.
 15. बदामी रंगावर तळावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर